BJP Office Bearer Arrested Sarkarnama
विदर्भ

BJP Office Bearer Arrested : भाजप पदाधिकाऱ्याची घाणेरडी खेळी! दुसऱ्याच्या नावाने फेसबुक आयडीवरून पसरवला विषारी मजकूर

Gondia Police arrested BJP office-bearer Gauresh Bawankar allegedly creating fake social media account and posting objectionable content against Dr. Babasaheb Ambedkar and Ambedkarite community : गोंदिया जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याने फेसबुकवर दुसऱ्याच्या नावाने आयडी बनवत, त्यावरून महापुरूषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा प्रताप केला आहे.

Pradeep Pendhare

Gondia news : दुसऱ्याच्या नावाने फेसबुकवर खोटी, बनावट आयडी तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी जनतेच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचा गोंदिया जिल्हा सचिव गौरेश बावनकर (रा. कोसमतोंडी, ता. सडक अर्जुनी) याला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली.

न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. गौरेश बावनकर याला भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करताच, जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले यांनी गौरेश बावनकर याची तातडीने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर दिनेश ब्राह्मणकर या आयडीवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यावर सडक अर्जुनी इथल्या रोशन बडोले यांनी आठ मे रोजी डुग्गीपार पोलिस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली.

या आधारे डुग्गीपार पोलिसांनी केलेल्या तपासात सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी इथल्या भाजपच्या (BJP) गौरेश बावनकर या व्यक्तीने फेसबुकवर दिनेश ब्राह्मणकर या नावाने बनावट आयडी तयार करून हे कृत्य केल्याचे पुढे आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत गौरेश बावनकर याला अटक केली.

या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर त्याने केलेल्या पोस्टला लाईक, कमेंट्स व शेअर करणाऱ्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील आंबेडकरी विचार मंचाने केली आहे. सात दिवसांत आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले यांनी गौरेश बावनकर याला पदावरून हटवण्याबरोबर, पक्षातून तातडीने हाकलपट्टी केली आहे. पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांनी, तपासात गौरेश बावनकर याने दिनेश ब्राह्मणकर या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे उघड झाले. तांत्रिक पुरावे असल्याने त्याला, न्यायालय गुन्ह्यात शिक्षा ठोठावेल, असे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT