

Beed assault case : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन, बराच कालावधी ओलांडून गेला आहे. तरी त्याली विजय-पराभवावरून धुसफूस सुरूच आहे.
बीड नगरपालिकेमधील पराभवाचा राग मनात धरून, भाजप नगरसेविकेच्या पतीला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
नगरपालिका निवडणुकीत (Election) भाजपकडून भाग्यश्री देशपांडे या विजयी झाल्या आहेत. विरोधक असलेले बाळू जाधव यांचा पराभव झाला. निवडणुकीतील पराभवावरून, बाळू जाधव गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर यांच्याशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालत होते. या वादाचे पुढे, हाणामारीत रूपांतर झाले. याप्रकरणी सागर देशपांडे यांच्या तक्रारीवरून बीड शहर पोलिसांनी बाळू जाधव याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सागर देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी भाग्यश्री देशपांडे ही प्रभाग क्रमांक सातमधून भाजपचे (BJP) अधिकत उमेदवार होत्या, तर प्रतिस्पर्धी बाळू जाधव हा देखील त्याच प्रभागमधील उमेदवार होता. परंतु पत्नी भाग्यश्री देशपांडे ही निवडून आली. त्याचा राग मनात धरत बाळू जाधव हा अधुनमधून शिवीगाळ करत होता.
11 एप्रिलला रात्री सव्वाबारा वाजता, देशपांडे घरासमोरील रोडवर कबाड गल्ली इथं फोनवर बोलत उभे होते. त्यावेळी बाळू जाधव, यशराज जाधव आणि त्याच्या सोबत असलेले इतर तिघांनी रस्ता आडवला. तू इथं का उभा राहिलास, असे मोठ्या आवाजात दमदाटी करत, सुनावलं.
तू तुझ्या पत्नीला नगरपालिका निवडणुकामध्ये माझ्या पॅनलच्या विरोधात का उभा केले, असे म्हणत तू गल्लीत उभे राहायचे नाही, असा दम देत, बाळू जाधव आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी देशपांडे यांनी छातीवर, पोटावर, डोक्यावर, डोळ्यावर लाथाबुक्यांनी मारहाण केली.
बचावासाठी देशपांडे यांनी आरडाओरड केल्याने, तेव्हा बाळू जाधव याने साथीदारांना चिथावणी देत, आणखी मारहाण केली. यानंतर जीवे मारण्याची धमकी देत, निघून गेले. जखमी देशपांडे यांनी मित्र आकाश भोसले अन् शेख अजीज यांना, मदतीसाठी बोलावून घेत, पोलिसांना संपर्क केला. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बाळू जाधव, यशराज जाधव आणि इतर तिघांविरोधात देशपांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.