Harshwardhan Sapkal Criticises BJP Sarkarnama
विदर्भ

BJP 100 seats survey controversy : अंतर्गत सर्व्हे, भाजपला मुंबईत 100 हून अधिक जागा; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'दिंडोरा पिटण्यात...'

Harshwardhan Sapkal Criticises BJP Survey Claiming Over 100 Seats in Mumbai Civic Polls : मुंबई महापालिकेसाठी भाजपने अंतर्गत केलेल्या सर्व्हेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Congress reaction on BJP survey : मुंबईत महापालिकेत भाजप स्वबळावर 100 जागा जिंकरणार असल्याच सर्व्हेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला आहे.

'निवडणुकीपूर्वी अशी भाकितं करणं चुकीचं आहे. भाजपचा हा दिंडोरा आहे. अशा ढिंढोऱ्या आडून, निवडून आयोगातही त्यांनी मोठा घोळ घातला,' असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "निवडणुकीच्या पूर्वीच भाजपने (BJP) अशी भाकित करणे चुकीचे आहे . निवडणुका या वैचारिक भूमिका मांडण्याचा अधिकार असतो . जनतेने दिलेला कौल स्वीकारायचा असतो." मात्र निवडणुकीच्या आधीच भाजप दिंडोरा पिटत चालला आहे. दुसरीकडे निवडून आयोगातही मोठा घोळ त्यांनी घातला. आगे-आगे देखो क्या होता है, असेही सपकाळ यांनी म्हटले.

वंचितबरोबर युतीवर हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "कार्यकर्त्यांची आणि भारतातील संविधानवादी नागरिकांची इच्छा आहे की, वंचित आणि काँग्रेस एकत्र आली पाहिजे. त्याचा आदर करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे माध्यमातून करत आहोत. जिल्हा पातळीवर काय चर्चा झाली, याची कल्पना नाही. मात्र एकत्र येणे काळाची गरज आहे."

दरम्यान, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा भाजपच्या मुंबईतील अंतरग्त सर्व्हेवर प्रतिक्रिया देताना, आनंद गगनात मावेनासा झाला होता. मंत्री महाजन म्हणाले, "आता तुम्ही बघाच काय काय होते. कोणी कितीही गर्जना केल्या तरी, मुंबई असेल, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक असेल या सर्व ठिकाणी आम्हाला बहुमत मिळेल, एकहाती आम्ही जिंकू."

'कोणी कितीही बडबड केली, तरी लोकांचा विश्वास हा भाजपवर आहे. देवेंद्रजी तसेच महायुतीवर आहे. सर्वांचा विश्वास हा महायुतीवर आहे.वरपासून ते खालपर्यंत महायुतीचे सरकार आहे. विकास करायचा असेल, तर निश्चितच महायुतीशिवाय पर्याय नाही. बाकीच्या पक्षाच्या लोकांचे हालत काय झालेली आहे आणि आता लोक त्यांना कुठे नेऊन ठेवते. हे तुमच्याकडून देखील बघवणार नाही. त्यामुळे सर्व्हेचे जे रिपोर्ट येत आहेत, ते खरेच आहेत,' असेही मंत्री महाजन यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT