BJP winning 100 seats survey : भाजपच्या सर्व्हेने एकनाथ शिंदेंची झोप उडाली; स्वबळावर 100 जागा निश्चित...

BJP Survey Predicts 100+ Seats in Mumbai Civic Polls; Shinde Sena & MVA Allies Concerned : मुंबई महापालिकेसाठी भाजपने तयारी सुरू केली असून, अंतर्गत केलेल्या सर्व्हेनुसार भाजपचा काॅन्फिडंट वाढवला आहे.
BJP winning 100 seats survey
BJP winning 100 seats surveySarkarnama
Published on
Updated on

Mumbai BMC election BJP lead : महाराष्ट्रानंतर बिहारची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपने वाढलेल्या काॅन्फिडंटचा मुंबई महापालिकेत घेण्याचं ठवरलं आहे. भाजपने मुंबई महापालिकेसाठी अंतर्गत सर्व्हे करत, त्याचा कौल जाणून घेतला आहे. मुंबई महापालिकेत 100 हून अधिक जागा जिंकत मुसंडी मारणार असल्याचं कौल मिळाला आहे.

या सर्व्हेमुळे भाजपमध्ये अंतर्गत गोठ्यात खुशीचा माहौल आहे. या सर्व्हेचा सर्वात जास्त, धक्का बसला आहे तो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अन् त्यापाठोपाठ महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व आहे. परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणानंतर राज्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे काँग्रेसला बरोबर घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे नेते आहेत. तर महायुतीत भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सुरू आहे. नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेष करून नगरपालिका निवडणुकीत भाजपने कंबर कसली आहे. काही ठिकाणचे नगराध्यक्षपद बिनविरोध झाले आहेत. यात महाराष्ट्रपाठोपाठ बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) एनडीएने विजयाची पताका कायम ठेवली आहे.

BJP winning 100 seats survey
Farmer Assault Controversy : अजितदादाच्या शिलेदारानं शेतकऱ्याला मुस्काटात मारली; पवारसाहेबांच्या युवा नेत्याचा 'GenZ'च्या आंदोलनाचा इशारा

अशातच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेवर विजय मिळवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. बिहार विधानसभेचा निकाल येत असतानाच, भाजपने मुंबई महापालिकेसाठी अंतर्गत सर्व्हे घेतला. या सर्व्हेचा कल आता समोर आला असून भाजप 100हून अधिक जागा जिंकले असा दावा केला गेला आहे. या सर्व्हेनुसार भाजपने लगेचच स्वबळाचा नारा लावला आहे. यामुळे महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

BJP winning 100 seats survey
CM fadnavis brother : सीएम फडणवीसांचा भाऊ बिनविरोध नगरसेवक : रवी राणांनी मोहीम केली फत्ते

एकनाथ शिंदेंची भाजपवर वाढती नाराजी

महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढले आहेत. एकनाथ शिंदे नुकताच दिल्ली इथं जाऊन आले. तिथं देखील त्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्ली दौऱ्यावरून आलेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चुप्पी दिसते आहे. समोरासमोर येऊन देखील ते एकमेकांशी बोलत नाहीत. याचा दोघांमधील वादाचे दूरगामी परिणाम होतील, असा विश्लेषकांचे म्हणणे आहे.

भाजपचे सर्व्हे अन् जनमताच्या चाचणींवर भर

महायुतीमधील भाजप अन् शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू असतानाच, भाजपने मुंबई महापालिकेची निवडणुकीची आक्रमकपणे तयारी सुरू केली आहे. भाजपकडून विविध माध्यमातून मुंबईतील जनमताचा कौल घेतला जात आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये पक्षाला 100 हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळू शकतं, असा निष्कर्षही या सर्व्हेमधून काढण्यात आला आहे.

काँग्रेस नेत्यांचा स्वबळाचा नारा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र येतील, असे चित्र आहे. महाविकास आघाडीत मात्र राज ठाकरे यांच्या एन्ट्रीने बिघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राज ठाकरे यांच्या मनसेविरोधात भूमिका घेतली आहे. यातूनच काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत देखील मध्यतंरी स्वबळाचा नारा दिला होता. आता मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाविकास आघाडीत मनसेच्या एन्ट्रीवर पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच महाविकास आघाडीचे गणितं बदतील, असे अंदाज आहे.

ठाकरे बंधू राजकीय दिशा बदलणार

परंतु भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरच, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या गोठ्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण केली आहे. विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, कोणती राजकीय भूमिका घेऊन, भाजपच्या रथ रोखतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com