Nagpur ZP Sarkarnama
विदर्भ

Nagpur ZP News : राज्याचा पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवून केदार गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न !

सरकारनामा ब्यूरो

Atish Umre gave a clear indication about this : राज्याच्या राजकारणात कधी नव्हे येवढ्या वेगवान घडामोडी गेल्या वर्षभरात झाल्या. शिवसेनेत मोठी बंडखोरी करून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावला आणि शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत सामील झाले. हाच प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेत राबवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. (Both Eknath Shinde and Ajit Pawar are in power with the BJP)

एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही गट भाजपसोबत सत्तेत आहे. यामुळे भाजपचा आत्मविश्‍वास वाढला आहे. यानंतर नागपूर जिल्हा परिषदेतही ऑपरेशन लोटसचा प्रयोग करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव केली जात असून अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस सदस्य शांता कुमरेंवर हा डाव खेळला जाणार आहे.

विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी बाबत स्पष्ट संकेत दिले. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून आमदार सुनील केदार गटाचे वर्चस्व आहे. पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळी उफाळून आलेली गटबाजी आताही कायम आहे. यातच अध्यक्षपदासाठी दावेदार असलेल्या शांता कुमरे यांना डावलण्यात आल्याने त्या नाराज असल्याचे सांगण्यात येते.

कुमरेंची नाराजी हेरून भाजपने नुकतेच त्यांना डीपीसीवर घेतले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यात भाजपसोबत शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) सत्तेत आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्तेत आहे. मागील वेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे तीन व राष्ट्रवादीचे एक मत फुटले होते. राज्यात सत्तांतरामुळे भाजपमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

राज्याचा पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात अध्यक्षांवर अविश्वास आणण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. ३० आकडा झाल्यावर विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यात येईल. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या पदासाठी भाजपकडून शांता कुमरे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट संकेत विरोधी पक्षनेते उमरे यांनी दिले.

सत्तापक्ष नेत्यांच्या कामावर असमाधान..

जिल्हा परिषदेत सत्ता पक्षनेते पदावर अवंतिका लेकुरवाळे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून सदस्यांना वेळ देण्यात येत नाही आणि त्यांच्या प्रश्नांनाही न्याय देण्याचा प्रयत्न होत नाही. निधी वाटपात असमानता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने त्यांच्याबाबत सदस्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येते.

मी कॉंग्रेस, (Congress) इंदिरा गांधीनिष्ठ आहे. कॉंग्रेसला सोडून जाणार नाही. विरोधकांकडून दिशाभूल करण्यात येत आहे. काहींना माझी भीती वाटत आहे. वेळप्रसंगी मी विधानसभा लढेल, त्यामुळे असे वातावरण निर्माण केले जात आहे, असे कॉंग्रेसच्या सदस्य शांता कुमरे म्हणाल्या.

जिल्हा परिषदेतील संख्याबळ - एकूण सदस्य ः ५८ - कॉंग्रेस ः ३२, (BJP) भाजप ः १४, राष्ट्रवादी ः आठ, (Shivsena) शिवसेना (शिंदे गट) ः एक, शेकाप ः एक, गोंगपा ः एक, अपक्ष ःएक

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT