Nagpur News: सुमारे महिनाभरापासून रखडलेली भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या (BJP) दोन आमदारांमध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू होती. आपल्या समर्थकाला अध्यक्षपद मिळावे यासाठी दोघांनीही ताणून धरले होते. संभाव्य अध्यक्ष म्हणून जी दोन नावे समोर ठेवण्यात आली होती त्यापैकी एकाला ड्रायव्हर तर दुसऱ्याला कंडक्टर असे गमतीने म्हटले जात होते. त्यामुळे कोण बाजी मारतो याकडे सर्व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.
भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी भाजयुमोच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला. शनिवारी त्यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीनुसार भाजयुमोच्या अध्यक्षपदी सचिन करारे यांची नियुक्ती झाली आहे. ते पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत. महामंत्री म्हणून रितेश पांडे, कुलदीप माटे, अक्षय ठवकर, रिषभ अरखेल यांचा समावेश करण्यात आला आहे.
नागेश साठवणे हे संपर्क महामंत्री झाले आहेत. महामंत्रीपदी नियुक्त झालेले रितेश पांडे हे यापूर्वी लोकसभा निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख होते.
भाजपच्या शहर कार्यकारिणीत महामंत्री असलेले पांडे आता भाजुमोच्या कार्यकारिणीत आले आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजयुमोतून कार्यकर्ते शहराच्या कार्यकारिणीत जातात. मात्र पांडे हे वरून खाली आहेत.
कुलदीप माटे यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. मात्र त्यांना महामंत्री करण्यात आले आहेत. महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यापूर्वी सर्व आघाड्या भाजपने जाहीर केल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने युवा कार्यकर्त्यांना अधिकाधिक प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. आता भाजयुमोच्या किती कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकीत (Nagpur Mahapalika) उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपने अध्यात्मिक आघाडीची कार्यकारिणी जाहीर केली आहे. डॉ. श्रीरंग वराडपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भजन स्पर्धेच्या घेऊन त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून वराडपांडे हे सातत्याने सर्वांच्या संपर्कात होते. अध्यक्षपदी नियुक्ती करून याचे बक्षीस त्यांना देण्यात आले. अल्पसंख्य आघाडीच्या अध्यक्षपदी असलम खान, ख्रिश्चन आघाडीच्या अध्यक्षपदी विकास फ्रांसिस, एनजीओ आघाडी राजेश वाघ यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.