Nagpur Mahapalika News : नागपूरमध्ये प्रभाग रचनेचा मुद्दा तापला; भाजप व काँग्रेसच्याही आमदारांचा आक्षेप

Nagpur Municipal Corporation Ward Structure: नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आतापर्यंत 115 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनीही आक्षेप घेऊन सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
Municipal Corporation, Nagpur
Municipal Corporation NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आतापर्यंत 115 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. भाजपचे माजी शहर अध्यक्ष बंटी कुकडे, महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती पिंटू झलके यांनी प्रभाग क्रमांक 26 आणि प्रभाग क्रमांक 28 च्या सीमा व काही वस्त्यांवर आक्षेप नोंदवले आहेत.

नागपूरमधील या दोन्ही प्रभागाची रचना करताना महापालिकेचे झोन आणि विधानसभा मतदारसंघाच्या सीमांचा विचार करण्यात आला नसल्याचा मुख्य आक्षेप त्यांचा आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे व काँग्रेसचे (Congress)आमदार अभिजित वंजारी यांनीही आक्षेप घेऊन सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक 26 वाठोडा प्रभागातून बंटी कुकडे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तसेच भाजपचे (BJP) प्रवक्ता धर्मपाल मेश्राम यांच्यासह चारही नगरसेवक भाजपचे निवडूण आले होते. या प्रभागाच्या रचनेवर एकूण 11 च्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत.

प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्याचा गुरुवारी (ता.4) शेवटचा दिवस होता. प्रभाग क्रमांक 26 चा समावेश महापालिकेच्या नेहरुनगर झोनमध्ये येतो. असे असताना लकडगंजमध्ये येणाऱ्या अबुमियानगरसह काही वस्त्या वाठोडा प्रभागाला जोडण्यात आल्या आहेत.

Municipal Corporation, Nagpur
PM Modi Manipur Visit: पंतप्रधान मोदींचा हिंसाचारात होरपळलेल्या मणिपूरबाबत 'हा' मोठा निर्णय

त्यापूर्वीप्रमाणे प्रभाग क्रमांक 23 मध्ये टाकण्यात याव्या, त्या ऐवजी रमणा मोराती परसिरस वाठोडा प्रभागास जोडण्यात यावा अशी मागणी आक्षेप घेणारे बंटी कुकडे यांची आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष पिंटू झलके यांनी प्रभाग क्रमांक 28 च्या हद्दीवर आक्षेप नोंदवला आहे. मौदा दिघोरी आणि मौजा वाठोडा या दोन्ही गावांच्या हद्दीवर त्यांचा आक्षेप आहे.

Municipal Corporation, Nagpur
Kolhapur Ward News: 'कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच...'; प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या नेत्याचा कॉन्फिडन्स वाढला

मौजा वाठोडा हा पूर्व नागपूर विधानसभा मतदरसंघ क्षेत्रातील भाग आहे. या प्रभागातील ऑरेंजनगर येथील 50 घरांचा भाग म्हणजेच सुमारे दोनशे मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक 28 मध्ये करण्यात आला आहे. दिघोरी प्रभाग हा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. याशिवाय मौजा बहादुरा या ग्रामीण भागातील काही भाग दिघोरीच्या प्रभागात टाकण्यात आला आहे. तो वगळण्यात यावा अशी मागणी पिंटू झलके यांनी केली आहे.

Municipal Corporation, Nagpur
Prakash Ambedkar News: फडणवीस सरकारच्या 'जीआर'नंतर आंबेडकरांचा नवा बॉम्ब; म्हणाले, 'जरांगेंसह मराठा समाजाची मोठी फसवणूक...'

या खालोखाल प्रभाग क्रमांक 5 बिनाकी मंगळवारी या प्रभागात आठ, मिलिंदनगर व राणी दुर्गवाती चौक परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकूण आठ, प्रभाग क्रमांक दोनमध्ये सहा, प्रभाग क्रमांक एकमध्ये पाच, प्रभाग क्रमांक तीनमध्ये चार, सातमध्ये सहा, प्रभाग आठमध्ये पाच, प्रभाग नऊमध्ये पाच, प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाच, 12 मध्ये पाच, 14 वर एक, 17 वर एक, प्रभाग 18 वर एक, 19 वर पाच, 20 वर एक, 21मध्ये दोन ,22 मध्ये दोन, 23मध्ये तीन, 27 वर दोन, 28 वर एक, 31 वर दोन, 32 वर एक, 34 वर एक, 35 वर एक, 36 वर एक, 38 वर दोन आक्षेप घेण्यात आले आहेत.

Municipal Corporation, Nagpur
GST Reform: सरकारचा मोठा गेम! एका गोष्टीवर भरमसाठ वाढवला कर; खाण्यापिण्यासह प्रत्येक गोष्ट होणार महाग

या सर्व प्रभागांमध्ये सीमांकनाचे, बुथ शिफ्टिंगचे आक्षेप आहेत. काही नागरिकांनी संपूर्ण प्रभागाची नव्याने रचना करण्याची मागणी केली आहे. या आक्षेपांवर सुनावणीसाठी शासनाच्यावतीने नागपूर महापालिकेची माजी आयुक्त तसेच नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व आक्षेपांवर एकाच दिवशी सुनावणी घेण्यात येणार असून सुनावणीची तारीख शुक्रवारी (ता.5) जाहीर करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com