Gogawale Vs Tatkare : रायगडमधील संघर्षात नवा ट्विस्ट! कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, मात्र मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे मंचावर एकत्र

Bharat Gogawale and Aditi Tatkare together in Alibag During Mahad Political tension : सध्या रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद आता कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीपर्यंत आला आहे.
Raigad Politics Bharat Gogawale and Aditi Tatkare
Raigad Politics Bharat Gogawale and Aditi Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  • रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील तणाव पुन्हा चिघळला आहे.

  • महाडमध्ये कार्यकर्त्यांच्या हमरी-तुमरीनंतर वातावरण तापले असतानाच, अलिबागमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे एकत्र आले.

  • रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या या एकत्र येण्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Raigad News : रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार वाद उफाळला असून आता याची ठिणगी महाडमध्ये पडली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेकडो समर्थकांनी महाड शहरात प्रवेश राष्ट्रवादीला दम भरला आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आली असून येथील राजकीय वातावरण तंग झाले आहे. एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर उतरले असतानाच दुसरीकडे मात्र मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले एका कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे रायगडमध्ये नेमकं काय सुरू आहे, असाच प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होताना दिसत आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं दावा केला आहे. यावरूनच मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात सतत वाद होताना दिसत आहे. तटकरे यांनी केलेल्या राजकीय वारावर आता शिवसेनेचे इतर आमदारही मैदानात उतरल्याचे सध्याचे चित्र आहे.

रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद युती तुटण्यापर्यंत आला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीशी युती नाहीच अशी भूमिका घेतली आहे. ज्यानंतर राष्ट्रवादीने देखील पलटवार करताना आम्हाला देखील शिवसेनेची गरज नाही असे म्हटले होते.

Raigad Politics Bharat Gogawale and Aditi Tatkare
Raigad Politics : रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; 'गोगावलेंना' शांत बसवण्यासाठी तटकरेंची जुन्या मित्राला साद?

तोच आता प्रवक्ते देशमुख यांनी केलेल्या टीकेनंतर पेण, पाली, सुधागड तालुक्यातील सुमारे 200 ते 250 शिवसैनिकांनी महाडमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत राष्ट्रवादीलाच थेट आव्हान दिले. दळवी यांचे भाचे व युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांनी तर “आम्ही राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे केलेले हल्ले सहन करणार नाही” असा इशाराच दिला. यामुळे जिल्ह्यात राजकीय तणाव निर्माण झाला असून शिवसेनेनं राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते देशमुख यांना दम दिल्याची चर्चा सुरू आहे.

खासदार सुनिल तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांना डावलून एकाकी कार्यक्रम केला. ज्यामुळे शिवसेना पदाधिकारी चांगलेच संतापले होते. त्यावेळी शिवसेना व गोगावले यांची क्रेझ वाढत असल्याने तटकरे यांच्याकडून असे कार्यक्रम केले जात असल्याचा आरोप शिवसेनेतून झाला होता. तर आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी तटकरे वैयक्तिक कार्यक्रम करत असल्याचा दावा देखील केला गेला. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विपुल घोसाळकर यांनी तटकरे यांनी गोगावले यांच्या वाढत्या क्रेझचा धसका घेतल्याचे म्हणत संताप व्यक्त करण्यात आला होता.

एकीकडे जिल्ह्यातील अशा पद्धतीने राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे मात्र नेतेमंडळी एकमेकांच्या शेजारी हसत असल्याचे समोर आले आहे. मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याने सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अलिबागमध्ये शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे पुन्हा एकदा एकत्र आले. एकाच वेळी दोन्ही नेत्यांनी व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी दोघांनी मिळून जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

Raigad Politics Bharat Gogawale and Aditi Tatkare
Guardian Minister of Raigad Politics : 'भरत'शेठच्या पालकमंत्री पदावर उदय शोधतोय राम'बाण' उपाय

FAQs :

प्र.१: रायगड जिल्ह्यात नेमका कोणता वाद सुरू आहे?
उ: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे.

प्र.२: महाडमध्ये काय घडलं?
उ: महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र हमरी-तुमरी झाली.

प्र.३: भरत गोगावले आणि आदिती तटकरे कुठे एकत्र आले?
उ: दोघेही अलिबागमध्ये शासनाच्या वतीने आयोजित रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात एकत्र आले.

प्र.४: त्यांच्या या एकत्र येण्याला काय महत्त्व आहे?
उ: सध्या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु असताना, या दोघांची एकत्र उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

प्र.५: पुढील काळात या वादाचा परिणाम काय होऊ शकतो?
उ: या वादामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com