Maharashtra Politics Update : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारविरोधात टीकेचा 'दांडपट्टा' सुरूच आहे.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, सपकाळ यांना अभिनेता अमिर खान याच्या 'गजनी' पात्राचा आठवण झाली. आणि सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का?, असा घणाघात केला.
काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra) झंझावात सुरू आहे. महाराष्ट्रातला कानाकोपरा पायाखालून घालताना काँग्रेस संघटना, पक्षाची बांधणीवर काम करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते बुलढाणा इथं दौऱ्यावर आहेत. तिथून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
खडकपूर्णाच्या डाव्या कालव्याहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रशासकीय मंजूरी देऊन त्याला वर्क आॅर्डर देखील दिली होती. आता म्हणतात की, पाणी दिलं जाऊ शकत नाही. त्यांचे हे विधान असेल, तर त्यांनी एकदा तपासून बघावं, तेव्हाचे तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने फडणवीस यांनी त्यांना हे गिफ्ट दिलं होतं, याची आठवण हर्षवर्धन सपकाळ यांनी करून दिली.
याच पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता. आता चक्क ते दिलेल्या आश्वासनावर आणि साइन केलेल्या फाईलवरून ते घुमजाव करीत असतील, तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा. अथवा त्यांना 'गजनी' म्हटल्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय राहणार नाही, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
एक एप्रिलपासून नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गवरील टोलमध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एकंदरीत हे सरकार आहे, ते जुलमी सरकार आहे. सत्तेवर येत असताना वारंवार आश्वासने दिली. आता टोल काय सर्वच वाढणार आहे, याची ही सुरवात आहे, असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.