Buldhana Forest Office Sarkarnama
विदर्भ

Buldhana Forest : रोही, रानडुकराला मारण्यासाठी ‘फॉरेस्ट’ला ठोकले कुलूप

Office Locked : उपवनसंरक्षक कार्यालयात शेतकरी, आझाद हिंद संघटना आक्रमक

Fahim Deshmukh

Buldhana Forest : रोही आणि रानडुक्कर मारण्याची परवानगी 48 तासांत न मिळाल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक उपवनसंरक्षक कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. आता संघटनेने वन विभागाच्या शनिवारी (ता. 24) संघटनेच्या वतीने बुलडाण्यातील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले. आंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या वेळी प्रशासनामध्ये खळबळ उडाली.

मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेतील आदेशाचा विपर्यास करून स्थगितीचे कारण पुढे करीत शेतकऱ्यांना त्रासून सोडणाऱ्या रोही आणि रानडुक्कर मारण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. वन्यहिंस्र प्राण्यांकडून शेती पिकाची नुकसानभरपाई मिळावी. हिंस्र पशूंच्या हल्ल्यात मृत्युमुखी तथा जखमी शेतकरी शेतमजुरांना मोबदला मिळावा. यासह विविध मागण्यांसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत विविध आंदोलने केली. मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य सचिव, मुख्य वनपाल यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊन कायदेशीर अडचणी दूर केल्या. ही मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी सभागृहात केलेली आहे. असे असतानाही अद्याप रोही, रानडुक्कर मारण्याची परवानगी महाराष्ट्रातील उपवनसंरक्षक कार्यालयाकडून देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निसर्गाच्या कोपामुळे बुलडाण्यातील शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झाले. उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा वनक्षेत्र सोडून शेतांकडे वळविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावला जात असला तरी वन विभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा करीत आहे. वनक्षेत्राजवळील शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या रानडुकरांना मारण्याची परवानगी सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहत शेतकऱ्यांना दिली आहे. लोकवस्तीत किंवा शेतीत घुसलेल्या रानडुकरांना मारण्यासाठी वन्यजीव कायद्याच्या अधीन राहून सरकारने ही परवानगी दिली आहे. मात्र, याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

उपवनसंरक्षक कार्यालयाकडून शेतकऱ्यांना रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी मिळाली नसल्याने आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सतीश रोठे यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी बुलडाणा येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकण्यात आले. त्यानंतर शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्वरित मागण्यांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व उपवनसंरक्षक कार्यालयांना आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा या वेळी अॅड. रोठे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांसमोर नवे संकट!

निसर्गाचा लहरीपणा आणि शेतकरीविरोधी धोरणात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याला आता वन्यप्राण्यांमुळे नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. रानडुक्कर, रोही व अन्य वन्यप्राण्यांचे कळप उभे पीक फस्त करीत आहेत. वन विभागाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात शिथिलता आणून शेतकऱ्यांना शस्त्र परवाने देण्याची गरज आहे. यात शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला जात असल्याने योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT