Buldhana Politics : अपक्षांनी स्वतःच घोषित केली उमेदवारी, प्रचारदेखील सुरू !

Lok Sabha Election 2024 : शेळकेंची जनसंवाद यात्रा, तर तुपकरांची निर्धार यात्रा
Ravikant Tupkar, Sandeep Shelke
Ravikant Tupkar, Sandeep ShelkeSarkarnama
Published on
Updated on

फहीम देशमुख

Buldhana Political News : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. महाविकास आघाडी व महायुतीचे उमेदवार अजून ठरले नसले तरी बुलडाणा जिल्ह्यातील लढती जवळपास स्पष्ट झाल्या आहेत. अपक्षांचा जोर सध्या वाढलेला दिसत आहे. अपक्षांनी स्वतःच्या उमेदवारी जाहीर करत प्रचारास सुरुवात केली आहे.

तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील अर्ध्या जिल्ह्यात प्रचार सभा, कॉर्नर बैठका आणि आपले जाहीरनामे मतदारांपर्यंत पोहाेचविले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात राजकीय पक्षांपेक्षा अपक्षच प्रचारात वरचढ असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

सुमारे 1300 च्या जवळपास खेडी,15 मोठ्या शहरात होर्डिंग्ज, पत्रके, प्रचार फेऱ्या, सभा घेणे आघाडी व राजकीय पक्षांना शक्य नाही. याचाच फायदा घेत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेल्या ‘वन बुलडाणा मिशन’चे संदीप शेळके आणि शेतकरी नेते रविकांत तुकारांनी आपल्या प्रचारास सुरुवात केलेली आहे.

शेळकेंची जनसंवाद यात्रा, तर तुपकरांची निर्धार यात्रा जिल्हाभर फिरत आहे. सध्या मैदानात प्रतिस्पर्धी नसल्याने दोघांचे जनसंपर्क दौरे, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी, सभा आणि यात्रांना प्रतिसादही मिळत आहे. काहीही गमावण्यासारखे नसल्याने ‘मायलेज’ गाठण्याचे उद्दिष्ट ठेवत हे अपक्ष तुटपुंज्या यंत्रणेसह अधिकाधिक मतदारांपर्यंत जाण्याच्या तयारीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravikant Tupkar, Sandeep Shelke
Sanjay Raut : "भाजपचे 10 बाप झाले आहेत, शिवसेना ही...", राऊतांचं फडणवीसांना सडेतोड प्रत्युत्तर

शिवसेनेचा गढ म्हणून बुलडाणा लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. सलग तीनदा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते दाखल झाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जवळपास सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आघाडी, युतीतील जागावाटपाचा ‘फाॅर्म्यूला’ही ठरवला जात आहे. अशात बुलडाणा मतदारसंघावर भाजपने दावा सुरू केला आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना कमळ निशाणीवर निवडणूक लढवावी लागते की, बाणावर हे येणारा काळच ठरवेल.

अपक्ष तुपकर शिवबंधन बांधणार का ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुलडाणा मतदारसंघांत स्वाभिमानी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केलेली आहे. यानंतर रविकांत तुपकर यांच्याकडून स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जिल्ह्यातील राजकारणात गटबाजी असल्याने आणि शेट्टीकडून तुपकरांकडे दुर्लक्ष होत असल्याने तुपकर यांनी स्वबळावर लढण्याची तयारी चालविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघासह सहा इतर लोकसभा मतदारसंघ हे स्वाभिमानीसाठी ठेवले आहेत. यांनतर रविकांत तुपकरांकडे महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पर्याय ही समोर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

संदीप शेळकेंचा मिशन लोकसभा

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात या वेळी होणारी लढत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. अनेक संभाव्य उमेदवार निवडणुकीची तयारी करीत आहेत. यामध्ये दुसरे नाव आहे संदीप शेळके. राजकारणात अद्याप कुठलेही राजकीय लेबल लागलेले नसतानादेखील राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक तथा वन बुलडाणा मिशनचे संदीप शेळके यांनी निवडणुकीचा घोडामैदान अजून दूर असतानादेखील आपल्या जनसंवाद यात्रा आणि प्रत्येक तालुक्यात बूथ मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहाेचले आहेत. त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत संवाद यात्रा काढली.

R

Ravikant Tupkar, Sandeep Shelke
Loksabha Election 2024 : '23' आकडा ठरवणार बबनराव घोलप यांचं राजकीय भवितव्य? घोटाळा प्रकरणात कोर्टात उद्या सुनावणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com