Shasan Aplya Dari Sarkarnama
विदर्भ

Buldhana Maratha Protest : जालन्यातील लाठीमारानंतर बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला कडक सुरक्षा ; मराठा नेत्यांचा विरोध..

Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.

Mangesh Mahale

Buldhana News : मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेनंतर बुलढाण्यात आज (रविवारी) राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मराठा नेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर राहणार आहेत. मात्र बुलढाणा शहराचा जर चित्र बघितले तर हा सरकारी कार्यक्रम आहे की राजकीय सभा असा प्रश्न उपस्थित झाला आहे, कारण कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वत्र भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीनही पक्षाचे झेंडे दिसत असल्याने नागरिक संभ्रमात आहेत.

मंत्री संजय राठोड यांचा ताफा अडविला...

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मंत्री संजय राठोड हे बुलढाण्यात येत असताना त्यांच्या गाडीच्या ताफासमोर टायर जाळून त्यांचा ताफा रोखण्यात आला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मराठा समाजातील कार्यकर्ते यांनी मेहकर तालुक्यातील हिवराश्रम येथे राठोड यांचा ताफा जवळपास अर्धा तास अडवून धरला होता. जालना येथील घटनेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT