Buldhana News : बुलढाणा जिल्हा दोन युवकांनी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने हादरलं आहे. या दोन्ही युवकांनी लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा आणि चिखली तालुक्यातील मंगरूळ इथं या घटना घडल्या आहेत.
या युवकांनी लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याने, पुन्हा एकदा लग्न न होणे हा सामाजिक समस्येचा विषय चर्चेत आला आहे. राज्यकर्ते अन् प्रशासनाकडून यावर उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी केली जात आहे.
लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांत दोन युवकांनी आपलं आयुष्य संपवलं. या दोन्ही घटनांमुळे बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात सोनाळा इथल्या 28 वर्षीय युवकाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.
हरीश वानखडे (वय 28) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. घरातील सर्व मंडळी आपापल्या कामावर गेल्यानंतर, त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. हरीश हा भूमिहीन असून गरीब कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील मागील गेल्या 02 ते 03 वर्षापासून त्याच्या लग्नासाठी (Marriage) मुलगी पाहत होते.
परंतु गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हते. याचे त्याला नैराश्य होते. यातून त्याने गळफास घेत आयुष्य संपवल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तर दुसरी घटना अंढेरा पोलिस ठाण्यातंर्गत चिखली तालुक्यातील मंगरूळ इथं घडली असून सत्यपाल भिसे (वय 25) या युवकाने सुद्धा लग्न जुळत नसल्याने व्यसनाधीन होऊन झाडाला गळफास घेतला. सत्यपाल याच्या सोबतच्या मित्राचे लग्न झाले, शिक्षण भरपूर झाल्याने नोकरी मिळत नव्हती, शिवाय लग्न सुद्धा जुळत नव्हते, त्यामुळे त्याला व्यसन सुद्धा लागले होते.
या नैराश्यातून त्याने टाकेचे पाऊल उचलले. या दोन्ही प्रकरणात पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही घटनेमुळे लग्न न होणे हे सामाजिक समस्या बनली आहे. राज्यकर्त्यांना प्रशासन चावलताना, युवकांच्या बेरोजगारीबरोबर लग्न न होण्याच्या समस्येकडे गांभीर्याने घेत, त्यावर प्रशासनामार्फत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.