Farmer distress kidney sale : किडनी विक्री रॅकेटची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर, पाच जणांना अटक; संवेदनाहीन सरकारवर बच्चू कडूंचा 'प्रहार'

Nagbhir Farmers Kidney Sale Case Chandrapur Police Arrest 5 Accused And Bachchu Kadu Slams BJP Mahayuti Government : चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथुर इथले शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडिया इथं जात किडनी विकली.
Farmer distress kidney sale
Farmer distress kidney saleSarkarnama
Published on
Updated on

Kidney selling racket Maharashtra : चंद्रपूरमधील किडनी विक्री प्रकरणाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. देशातील राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाना आणि उत्तर प्रदेशातील युवकांसह बांगलादेशातील काहीजण कंबोडियात किडनी विक्रीसाठी आले होते, असा दावा पीडित शेतकरी रोशन कुडे यांनी केला.

चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथुर (ता. नागभीड) इथले शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडिया इथं जात किडनी विकली. या प्रकरणातील अटकेतील सावकार किशोर बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे आणि सत्यवान बोरकर यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे. सहावा आरोपी मनीष घाटबांधे अद्याप पसार आहे.

मानवी अवयवांच्या तस्करीच्या दिशेने यंत्रणा तपास करीत आहे. किडनी विक्रीची पाळेमुळे शोधण्यासाठी अप्पर पोलिस (Police) अधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या प्रकरणात देशांतर्गत आरोपींचा शोध घेतल्यानंतर हे पथक कंबोडियाला जाणार आहे. आतापर्यंत तीन आरोपींची ओळख पटली असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

चंद्रपूरमधून (Chandrapur) रोशन कुडे हे डॉ. कृष्णा नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कात होते. कुडे आणि डॉ. कृष्णा यांची कंबोडियाला जाण्यापूर्वी केवळ एकदाच कोलकता विमानतळावर भेट झाली होती. त्यामुळे डॉ. कृष्णा हे खरोखर डॉक्टर आहेत का? याबाबत संशय निर्माण झाला आहे. रोशन कुडे यांची कंबोडियात नेमक्या कोणत्या रुग्णालयात किडनी काढण्याची शस्त्रक्रिया झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Farmer distress kidney sale
Nilesh Lanke post controversy : PM मोदींची भेट, उत्साहात शेअर केली पोस्ट, पुढे तीन वेळा एडिट; लंकेंकडून डॅमेज कंट्रोल?

पुन्हा एक सावकारीचा बळी

या प्रकरणी अटकेत असलेल्या लक्ष्मण उरकुडे याच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. फिर्यादी राजकुमार बावणे यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये उरकुडे याच्याकडून चार लाख रुपये 12 टक्के व्याजाने घेतले होते. कर्जफेडीसाठी त्यांनी दागिने गहाण ठेवून व नातेवाइकांकडून पैसे उचलून एकूण 31 लाख 42 हजार 600 रुपये दिले. तरीही आरोपीने 40 लाख रुपयांची खोटी थकबाकी दाखवून पैसे मागण्याचा तगादा लावल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

Farmer distress kidney sale
Satyajeet Tambe And Amol Khatal : रेल्वे मार्ग बदलला, कट्टर विरोधकांना एकत्र आणलं? तांबे खताळांचा संपर्क वाढला!

...तरीही सरकार शांत

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शनिवारी रोशन कुडे यांची भेट घेतली. सरकार धर्माच्या नावावर राजकारण करते. मात्र एका शेतकऱ्याची किडनी विकली गेली, तरी सर्वत्र शांतता आहे. दहा दिवस उलटूनही सरकार संवेदनाहीन कसे? आम्ही दहा दिवस गप्प बसलो, कोणी मोर्चा काढेल, कोणी मंत्री येईल या अपेक्षेने वाट पाहिली; मात्र या सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना नाहीत. त्यामुळे पालकमंत्रीही फिरकले नाहीत. एवढा मोठा प्रकार घडूनही मुख्यमंत्री गप्प का? साधा एक फोनसुद्धा का केला नाही, असा सवाल त्यांनी केला. स्थानिक आमदारही भेटीस आले नाहीत, ही शोकांतिका असल्याची टीकाही त्यांनी केली.

दोषींना सोडले जाणार नाही

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड परिसरात शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी किडनी विकावी लागल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून या प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. बेकायदा सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. संबंधित सावकारांना अटक झाली आहे. पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाईल. दोषींना सोडले जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com