काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ए़़जंट असल्याचा गंभीप आरोप करणारे मध्य नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना पुन्हा पटोलेंवर हल्लाबोल केला आहे. शेळके यांच्या पक्षाकडून कारवाई होण्याचे संकेत पटोलेंनी दिले होते. त्यानंतर 'तुम्हाला पक्षातून काढण्यात का येऊ नये', अशी नोटीस शेळके यांना काँग्रेसने बजावली आहे. या नोटिशीनंतर शेळके यांनी पटोलेंचा समाचार घेतला आहे.
नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहे, असे म्हणत नागपूर आरएसएसचे मुख्यालय आहे. ती जागा हरावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षसंघटन कमजोर ठेवलं, मला कुठली मदत केली नाही, असा आरोप बंटी शेळके यांनी केला. पटोले नोटीस बजावत असताना माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच आहे. मी पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी यांचा शिपाई आहे , असे म्हणत शेळके यांनी पुन्हा नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला.
आरएसएस एजंट नाना पटोले यांनी माझी नस कापली तर त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात काँग्रेसच लिहिलेला आहे. आम्ही आरएसएस एजंट पटोलेचे शिपाई नाही, तर राहुल गांधी यांचे शिपाई आहोत. भाजपचे बावनकुळे यांच्या मुलाच्या अपघात प्रकरणातही नाना पाटोले यांनी आवाज उठवला नाही, असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरेवरही नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. संघाचे मुख्यालय, नितीन गडकरी यांचे घर मध्य नागपूर मतदारसंघात असल्यामुळे ही जागा भाजपने जिंकावी यासाठी नाना पटोले यांनी काम करीत संघटन कमजोर केलं , असा आरोपही बंटी शेळके यांनी केला.
संघ मुख्यालयासमोर आरएसएसचा गणवेश जाळण्याचा काम बंटी शेळकेनं केलं. मात्र त्यावेळेस नाना पटोले एकही शब्द बोलले नाहीत. लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली.. त्यावर पटोले एकही शब्द बोलले नाही तेव्हा कुठे गेले होते, असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला. तीन जणांचं नाव प्रदेश कार्यालयातून पाठवण्यात आले होते, तेव्हा माझं उमेदवार म्हणून नाव टाकण्यात आलं नाही, असे शेळके म्हणाले.प्रियांका गांधी माझ्या प्रचारासाठी येत असताना तिथे काँग्रेसने कुठलीही ताकद, उमेदवार म्हणून मला दिली नाही. माझ्यावर कारवाई झाली तेव्हा काँग्रेसचे वकील सेल कुठे गेले होते, असा प्रश्न शेळके यांनी उपस्थित केला आहे.
बंटी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आहेत. राहूल गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचा थेट संपर्क आहे. ते 2019 च्या निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. असे असतानाही आपले नाव निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांच्या यादीत पटोले यांनी टाकले नाही, असाही त्यांचा आरोप आहे.
बंटी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आहेत. राहूल गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचा थेट संपर्क आहे. ते 2019 च्या निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. असे असतानाही आपले नाव निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांच्या यादीत पटोले यांनी टाकले नाही, असाही त्यांचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.