Bachhu kadu, Navneet Rana, Anandraj Ambedkar, Prakash Ambedkar
Bachhu kadu, Navneet Rana, Anandraj Ambedkar, Prakash Ambedkar  sarkarnama
विदर्भ

Loksabha Election 2024 : नवनीत राणांपुढे चार उमेदवारांचे आव्हान; आनंदराज आंबेडकरही रिंगणात....

Umesh Bambare-Patil

Amravati News : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप, काँग्रेस, वंचित, प्रहार, रिपब्लिकन सेना अशी बहुरंगी लढत होत आहे. आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहिली नसल्याचे बोलले जात आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळेस विद्यमान खासदार नवनीत राणा या पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत. यावेळेस त्या भाजपमधून निवडणूक लढत आहेत. अनेकांचा विरोध डावलून भाजपने त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर Dr. Prakash Ambedkar यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ते रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहेत. येत्या दोन एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विदर्भात सर्वात मोठा जिल्हा म्हणून अमरावती ओळखला जातो.

या जिल्ह्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने येथील विकास रखडला असल्याचे कारण पुढे करून आनंदराज आंबेडकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वंचित आघाडीकडून प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असला तरीही आपण अमरावतीमधून लढणार असल्याचे आनंदराव आंबेडकर सांगत आहेत. त्यामुळे भाजपच्या नवनीत राणा यांच्यापुढे एक, दोन नव्हे चार पक्षांच्या उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे राणा यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. अमरावतीतील ही बहुरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT