Mahayuti Cabinet  Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Cabinet : महायुतीच्या 39 आमदारांना मंत्रिमंडळात संधी; हे आहेत कॅबिनेट अन्‌ राज्यमंत्री!

Cabinet Expansion : महायुती सरकारमधील भाजपने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाख्या बड्या नेत्याला वगळले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनाही डच्चू दिला आहे.

Vijaykumar Dudhale

Nagpur, 15 December : महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात पार पडला. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आज ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये तब्बल ३३ आमदारांना कॅबिनेट, तर सहा आमदारांना राज्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडे १६ कॅबिनेट, तर तीन राज्यमंत्री, शिवसेनेला ९ कॅबिनेट, तर दोन राज्यमंत्रिपद आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद आले आहे.

महायुती सरकारमधील (Mahayuti Government) भाजपकडून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाख्या बड्या नेत्याला वगळण्यात आले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनाही डच्चू दिला आहे. भुजबळ यांनी पहिल्याच कार्यक्रमाला दांडी मारून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यासारख्यांना वगळण्याचे धाडस एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दाखवले आहे. त्यामुळे आगामी काळात ज्येष्ठ नेत्यांना सांभाळून नव्या मंत्र्यांना काम करावे लागणार आहे. महायुती सरकारमध्ये चार महिलांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपच्या तीन महिला आमदारांचा समावेश आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली आहे.

भाजपचे मंत्री (कॅबिनेट)

१ चंद्रशेखर बावनकुळे

२ राधाकृष्ण विखे पाटील

३ चंद्रकांत पाटील

४ गिरीश महाजन

५ पंकजा मुंडे

६ गणेश नाईक

७ अतुल सावे

८ मंगलप्रभात लोढा

९ जयकुमार रावल

१० आशिष शेलार

११ अशोक उईके

१२ शिवेंद्रराजे भोसले

१३ जयकुमार गोरे

१४ संजय सावकारे

१५ आकाश फुंडकर

१६ नितेश राणे

राज्य मंत्री

१७ माधुरी मिसाळ

१८ पंकज भोयर

१९ मेघना बोर्डीकर

शिवसेनेचे मंत्री (कॅबिनेट)

१ गुलाबराव पाटील

२ दादा भूसे

३ उदय सामंत

४ शंभूराज देसाई

५ संजय राठोड

६ संजय शिरसाट

७ भरत गोगावले

८ प्रताप सरनाईक

९ प्रकाश आबिटकर

राज्य मंत्री

१० आशिष जैस्वाल

११ योगेश कदम

राष्ट्रवादीचे मंत्री (कॅबिनेट)

१ हसन मुश्रीफ

२ धनंजय मुंडे

३ आदिती तटकरे

४ दत्तात्रेय भरणे

५ माणिकराव कोकाटे

६ नरहरी झिरवाळ

७ मकरंद पाटील

८ बाबासाहेब पाटील

राज्यमंत्री

९ इंद्रनील नाईक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT