Women Minister : महायुती मंत्रिमंडळात अवघ्या चार बहिणी लाडक्या; भाजप, राष्ट्रवादीकडून संधी, शिवसेनेची पाटी कोरी

Cabinet Expansion News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला संधी मिळू शकलेली नाही. भाजपने तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला मंत्रिमंडळात संधी दिली आहे.
Pankaja Munde, Meghna Bordikar, Madhuri Misal, Aditi Tatkare
Pankaja Munde, Meghna Bordikar, Madhuri Misal, Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 15 December : महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (CM Ladki Bahin Yojana) योजना सुरू केली, त्याचे फळही महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळाले आहे. मात्र, महायुतीच्या मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणींना संधी मिळणार, याची उत्सुकता असतानाच मंत्रिमंडळातील महिलांची संख्या पुढे आली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला संधी मिळू शकलेली नाही. भाजपने तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका महिलेला मंत्रिमंडळात संधी दिली आहे.

महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने मंत्रिपदेही त्यांच्याकडेच सर्वाधिक गेली आहेत. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार भारतीय जनता पक्षाला २१, शिवसेनेला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळणार आहेत. यामध्ये भाजप वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपल्या वाट्याला आलेली सर्व मंत्रिपदे पहिल्याच टप्प्यात भरणार आहेत.

भारतीय जनता पक्ष मात्र मंत्रिपदाची एक जागा रिक्त ठेवणार आहे. त्याद्वारे नाराजांना दाखविण्यासाठी ते गाजर ठरणार आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ही मंत्रिपदे अडीच वर्षांसाठी असतील आणि तो फॉर्म्युला तीन पक्षांसाठी असणार आहे, असेही सांगितले आहे, त्यामुळे अडीच वर्षांनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे दिसणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, लाडक्या बहिणींच्या मतांच्या जोरावर सत्तेत बसलेल्या महायुती सरकारमध्ये किती बहिणींना संधी मिळणार, याची उत्सुकता होती. मात्र आता मंत्रिमंडळातील महिला आमदारांचा आकडाच पुढे आला आहे. तब्बल २३० पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या महायुतीने केवळ चार महिलांना संधी दिली आहे. यातही भाजपने तीन महिला आमदारांना संधी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदी काम करण्याची संधी दिली आहे.

Pankaja Munde, Meghna Bordikar, Madhuri Misal, Aditi Tatkare
NCP Minister List : अजितदादांचा धक्कादायक निर्णय; भुजबळ, वळसे पाटील, आत्राम, बनसोडे, अनिल पाटलांचा मंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट

ज्या एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू करण्यात आली. त्या एकनाथ शिंदे यांनी मात्र, एकाही महिला आमदाराला मंत्रिमंडळात संधी दिलेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाकडून महिला आमदार निवडून आलेल्या असतानाही त्यांना संधी मिळू शकलेली नाही.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने तीन महिला आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. माधुरी मिसाळ या पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा मंत्री होणार आहेत. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आलेली आहे. मेघना बोर्डीकर ह्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत.

Pankaja Munde, Meghna Bordikar, Madhuri Misal, Aditi Tatkare
Solapur Politic's : एकाचवेळी मुख्यमंत्री अन्‌ उपमुख्यमंत्रिपद लाभलेल्या सोलापूरला पाच वर्षांपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा...

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. तटकरे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आले होते, तर महायुती सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली होती. आता पुन्हा एकदा तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदी संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com