Chandrapur District Farmers Political News : चंद्रपुरातील शेतकऱ्यांनी ३७ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची विक्रमी लागवड केली. नगदी पीक असल्याने आपली दिवाळी चांगली जाईल व पुढील पिकाच्या हंगामापर्यंत आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील, ही भोळ्याभाबड्या बळीराजाची अपेक्षा होती. (Considering the problem of farmers brothers, BRS took to the streets)
शेतकरी स्वप्न रंगवत असताना अचानक पिकांवर रोग आला. अन् सोयाबीनचे पीक उद्धवस्त झाले पिकांकडे बघून रडण्याशिवाय बळीराजासमोर दुसरा पर्याय उरला नाही. अशावेळी सरकारकडून मदतीची अपेक्षाही वाया गेली. अजूनही अनेक ठिकाणी नुकसानाचे पंचनामे करण्यात आले नाही. शेतकरी बांधवांची समस्या लक्षात घेत बीआरएस रस्त्यावर उतरली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बीआरएस नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात शनिवारी (ता. २१) रोजी राजुऱ्यांतील तहसील कार्यालयासमोर सोयाबीनचे ढिगारे जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी कापूस पिकाऐवजी या वेळी सोयाबीनला पसंती दिली, पण अचानक आलेल्या पिकावरील रोगाने उभं पीक आडवं झालं. जवळपास नव्वद टक्के सोयाबीन पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले.
मदतीसाठी बळीराजा माय बाप सरकारकडे डोळे लावून बसला होता. मात्र, अद्यापही मदतीच्या नावाने बळीराजाचे हात रिकामेच आहेत. दिवाळी ऐन तोंडावर आहे. पिकाची तर ऐसीतैसी झाली. अशात अनेक ठिकाणी पंचनामेच झाले नाहीत, तर मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल प्रचंड संताप आहे.
जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अतिशय बिकट स्थिती झाली आहे. हजारो रुपये खर्च करून हाती भोपळाच आला. अशावेळी संतप्त होऊन अनेक शेतकऱ्यांंनी आपल्या पिकांवर ट्रॅक्टर चालविला तर काहींनी शेतातील पिकावर जनावरे सोडली. शेतकऱ्यांची वाईट स्थिती लक्षात घेता बीआरएस समोर आली आणि शेकडो शेतकरी बांधवांनी राजुरा तहसील कार्यालयासमोर सोयाबीनचे ढिगारे जाळून लक्षवेधी आंदोलन केले.
तातडीने पॅकेज जाहीर करा, अन्यथा खुर्ची खाली करा, राज्य सरकार मुर्दाबादच्या घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र सरकार विदर्भातील बळीराजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. तातडीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांंना मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बीआरएसने केली आहे.https://twitter.com/SarkarnamaNews/status/1716462972602921415
दिवाळी अंधारात...
इकडे पीक निघालं की तिकडे तातडीनं बळीराजाच्या हाती पैसा खेळतो. म्हणून सोयाबीन पिकाला नगदी पीक म्हटले जाते. सोयाबीनचे पीक दरवेळी साधारणतः दिवाळीच्या पूर्वी निघते. याच भरवशावर शेतकरी आपली दिवाळी साजरी करतो. सोबतच त्यांच्या विविध गरजांची पूर्तता हे पीक करते. पण यंदा सोयाबीनच पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाची दिवाळी अंधारात जाणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.