Chandrapur District Political News : ‘अलीबाबा अन् चाळीस चोर’ ही प्रसिद्ध कथा आपण ऐकली आहे. पण महाराष्ट्रात सध्या दोन अलीबाबा अन् ऐंशी चोरांची टोळी निर्माण झाली आहे. ही टोळी सरकारमध्ये बसून चोरी, लूट करून डाके टाकत आहे. असा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (This gang is stealing, looting and committing robberies while sitting in the government)
भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे कट्टर समर्थक प्रा. हेमंत उरकुडे यांनी काल (ता. २१) सायंकाळी घुग्गूस येथे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, भाजपने अजित पवार यांना चोर म्हटले होते. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून महाराष्ट्राला लुटण्याचे काम करीत आहेत. भाजपने ईडीवाले जमा केले अन् आमच सरकार पाडलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जेव्हा देशात स्वातंत्र्याची लढाई सुरू होती, तेव्हा आता दिल्लीच्या सरकारमध्ये बसलेली मंडळी ब्रिटिशांचे पाय चाटत होती. राहुल गांधी म्हणतात, ‘नफरत के बाजार मे मोहब्बत कि दुकान खोलेंगे’ याच सूत्राने महाराष्ट्रात भक्कमपणे काँग्रेसचे काम सुरू असल्याचे वडेटटीवार म्हणाले.
जेलमध्ये जाईल, पण भाजपमध्ये नाही..
येत्या डिंसेबरमध्ये राज्यातील विरोधी पक्षनेते हे भाजपवासी होतील, असे भाजपच्या नेत्याकडून वारंवार सांगितले जात आहे. पण मला कशाचीच भिती नाही. एकवेळ जेलमध्ये जाईल, पण समाजासमाजांत विष पेरणा-या भाजपमध्ये जाणार नाही. राज्यात येणा-या दिवसात स्मार्ट मीटर येणार आहे. यामाध्यमातून आतापासूनच याचे पैसे काढण्यासाठी प्रति युनिट ३५ पैसे जमा केल्या जात आहेत.
या कामाचे टेंडर अदानीला देण्यात आले असून आता एक तारीख आली की मीटर बंद अशी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. अदानीला पुन्हा श्रीमंत बनवून गरिबांना अंधारात ठेवण्याचे पाप हे सरकार करीत आहे, असेही घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्त शोभा फडणवीस व देवराव भोंगळे यांचे कट्टर समर्थक प्रा. हेमंत उरकुडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने राजू रेडडी यांनी देवराव भोंगळेंना जोर का धक्का दिला आहे. उरकुडे यांच्या रूपाने पक्षाला एक मजबूत कार्यकर्ता मिळाला आहे. राजू रेडडी, रोशन पचारे, जावेद सिध्दिकी हे घुग्गूसमध्ये पक्षाचे तीन खांब होते. आता हेमंत उरकुडे यांच्या रूपाने चौथा खांब मिळाला आहे.
ही टीम पूर्ण ताकदीने पक्षासाठी काम करेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. घुग्गूस या औद्योगिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोरोनाच्या संकटकाळात घुग्गूसला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून दिल्याची आठवण यावेळी वडेट्टीवारांनी करून दिली. हेमंत उरकुडे हे काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रकाश देवतळे, नंदू नागरकर, शिवानी वडेटटीवार, नम्रता ठेमस्कर, राजू रेडडी, रोशन पचारे, जावेद सिध्दिकी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.