Congress Protest in Chandrapur For Road. Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Congress : धाबा-गोंडपिपरी रस्त्यासाठी विद्यार्थ्यांसह केला चक्का जाम

Protest : चार वर्षांनंतरही काम अपूर्ण असल्याबद्दल संताप

संदीप रायपूरे

Dhaba-Gondpipri Road : गोंडपिपरी-धाबा- हिवरा मार्गाच्या कामाला मंजुरी मिळुन चार वर्ष पूर्ण झालीत. अद्यापही या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. गेल्या चार महिन्यांपासून रोडवर गिट्टी पसरवून ठेवल्याने दुचाकी वाहनांच्या अपघातात वाढ झालीय. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रस्त्याची अधोगती झाली आहे. या गंभीर बाबीकडे गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीनं मंगळवारी (ता. २१) आंदोलन करीत लक्ष वेधलं.

चंद्रपूर येथील डोंगरगाव फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करीत काँग्रेसनं प्रशासनाचं लक्ष वेधलं. आंदोलनामुळं तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. तालुका काँग्रेस कमिटीनं कंत्राटदार व प्रशासनाविरुद्ध आपला राग व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तांगडे यांनी एक महिन्यात काम पूर्ण करू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. (Chandrapur Congress Protest For Gondpipri Dhaba Hiwra Road)

चंद्रपुरात २०१९ मध्ये गोंडपिपरी-धाबा या मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली. मूल पोडसा रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम देण्यात आलं. मात्र चार वर्ष झाल्यानंतरही कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. या महामार्गावर गिट्टी टाकण्यात आली आहे. या गिट्टीमुळं मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. या अपघातात अनेकाचे प्राणही गेले आहेत. महामार्गावर धुळीचे साम्राज्य असल्यानं अनेकांना श्वासनाचा त्रासही होतो.

रस्त्याचं कामच होत नसल्यानं काँग्रेसलं धाबा गावाजवळील डोंगरगाव-हिवरा फाटा येथे आंदोलन केलं. धाबा आणि लाठी पोलिसांचा यावेळी चोख बंदोबस्त होता. तहसीलदार शुभम बाहकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता येडे, कंत्राटदाराचे प्रतिनिधी, कार्यकारी अभियंता तांगडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. काँग्रेस नेते अभिजित धोटे, तुकाराम झाडे, नीलेश संगमवार, देवेंद्र बट्टे, राजू झाडे, विपिन पेद्दुलवार, अशोक रेचनकर, देविदास सातपुते, नामदेव सांगळे, श्रीनिवास कंदनुरीवार आदींनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महिनाभरात काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. त्यामुळं तीन तासानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रस्त्याची अवस्था खराब असल्याने धाबा-पोळसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. रस्ता खराब असल्यानं एसटी महामंडळ या मार्गानं बस सोडत नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहेत. त्यामुळं त्यांनीही संताप व्यक्त केला. रस्त्याचं काम महिनाभरात पूर्ण न झाल्यास पुन्हा परिसरातील ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं. याच रस्त्याच्या कामासाठी तेलंगणातील बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एक दिवस आधीच आंदोलन केलं.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT