Sudhir Mungantiwar, Dr. Ashish Deshmukh, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadanvis and Others Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Lok Sabha Constituency : ...तर मग इतर जातींच्या लोकांनी कुठं जायचं !

Sudhir Mungantiwar : जातीवर आणि सहानुभूतीवर कुठलीही निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. सहानुभूती एखाद्या व्यक्तीबद्दल नव्हे तर त्याने केलेल्या कार्याबद्दल असते.

Atul Mehere

Chandrapur Lok Sabha Constituency : निवडणुकीत जात फॅक्टर खूप महत्त्वाचा मानला जाता. इतर वेळी नाही, पण निवडणुकीत हमखास जातीपातीवर मतदान झालेले बघायला मिळते. अशा जाती-पातीच्या राजकारणावर राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर-वर्णी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रहार केला.

आज (ता. 26) नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रपूर येथे आयोजित सभेत मंत्री मुनगंटीवार बोलत होते. निवडणूक आली की जातीच्या राजकारणाला ऊत येतो. सद्यःस्थितीत यावरून सोशल मीडियावर काही पोस्टदेखील व्हायरल होताना दिसतात. तेव्हा एका जातीच्या भरवशावर उमेदवार निवडून येऊ लागले, तर साहजिकच ते त्या जातीच्या लोकांचीच कामे करतील, तर मग इतर जातीच्या लोकांनी जायचे कुठे, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. आशिष देशमुख, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, हंसराज अहीर, आमदार अशोक उईके, राखी कंचर्लावर आदी उपस्थित होते.

अर्थमंत्री असताना ११ हजार ९७५ कोटींनी सरप्लस रेव्हेन्यू बजेट दिलं आहे. स्वातंत्र्यांनंतर आजवर एकाही अर्थमंत्र्याला ते शक्य झालेलं नाही. यासाठी अरुण जेटली अर्थमंत्री असताना माझा सत्कार करण्यात आला आहे. चार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि दोन गिनेज बुकमध्ये रेकॉर्ड नोंद केलेले आहेत. महाराष्ट्रात चांगलं काम करत असताना पक्षाने जर मला दिल्लीच्या संसदेत काम करण्याची संधी दिली असेल, तर काही विचार करूनच दिली असणार, असे मुनगंटीवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जातीवर आणि सहानुभूतीवर कुठलीही निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. सहानुभूती एखाद्या व्यक्तीबद्दल नव्हे तर त्याने केलेल्या कार्याबद्दल असते. एका जातीचा मुद्दा रेटून कुणी राजकारण करत असेल तर मग इतर जातीच्या लोकांनी जायचे कुठे, हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे असे राजकारण फार काळ टिकत नाही.

माझ्यासोबत सर्व जाती-धर्मांचे लोक आहेत. ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. मी केवळ उभा आहे. पण लोकच ही निवडणूक लढणार आहेत. माझ्यासाठी ही जीवनातील आणखी एक निवडणूक आहे. मी निवडून आल्यावर चार फुटाने माझी उंची वाढेल, असं काहीही नाही, पण या मतदारसंघाच्या विकासाची उंची मात्र नक्कीच वाढणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT