Chandrapur News, 14 June : महायुतीचे उमेदवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लोकसभा निवडणुकीत 'टफ' फाइट झाली आहे. यात प्रतिभा धानोरकर यांनी 'हेविवेट' नेते सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
मुनगंटीवार यांच्या पराभवानं महायुतीतील घटक पक्षांसह भाजपलाही धक्का बसला. चंद्रपूर लोकसभेच्या सहाही विधानसभा क्षेत्रात धानोरकर यांना मताधिक्य मिळालं आहे. त्यासह अनेक उमेदवारांच्या गावातही प्रतिभा धानोरकर यांच्यात झोळीत जनतेनं भरभरून मते दिली आहेत.
सुधीर मुनगंटीवार तीनदा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यांचं घर चंद्रपुरात असून कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्कही मुनगंटीवार यांचा आहे. तरीही मतदारांनी मुनगंटीवार यांना साथ दिली नाही.
प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघात आघाडी घेत गड भक्कम ठेवला. यासह माहेरघर असलेल्या वणी परिसरातही धानोरकर यांना मताधिक्य मिळालं आहे.
चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात असलेल्या तीन उमेदवारांनी चंद्रपूरमधून नशिब आजमावलं होतं. पण, जनतेनं त्यांना नाकारल्याचं मतांतून दिसून येत आहे.
प्रतिभा धानोरकर
प्रतिभा धानोरकर यांचं मूळ गाव वरोरा येथील विधानसभा क्षेत्राचं त्या प्रतिनिधित्व करत आहेत. वरोरा शहरासह विधानसभा परिसरात 35 हजार 50 मतांची आघाडी धानोरकर यांना मिळाली आहे. त्यामुळे धानोरकर यांनी आपला गड शाबूत ठेवला आहे..
सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे तीन वेळा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना चंद्रपूर शहरात 39 हजार 327 मते मिळाली आहेत. पण, धानोरकर यांनी त्यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य चंद्रपूर शहरातून घेतलं आहे.
राजेश बेले
राजेश बेले यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. बेले हे चंद्रपूर शहरात वास्तव्यास आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत मतदारांवर ते प्रभाव पाडू शकले नाहीत. 2019 मध्ये वंचितच्या उमेदवारास मिळालेल्या मतांपेक्षाही कमी मते बेले यांना मिळाली आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.