Nagpur Central Assembly Constituency: दक्षिण, पूर्वचे प्रयोग फसले आता ठाकरे गटाला हवे मध्य नागपूर! ; मात्र काँग्रेस जागा सोडणार का?

Shivsena UBT And Congress : काँग्रेस यासाठी कितपत तयार होते यावरच शहरातील आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
Nana Patole-Uddhav Thackeray
Nana Patole-Uddhav ThackeraySarkarnama

Shivsena UBT demand For Nagpur Central Assembly Constituency seat : पूर्व आणि दक्षिण नागपूरमध्ये सातत्याने अपयशी ठरत असल्याने आता महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ सोडावा, अशी मागणी ठाकरे गटाच्यावतीने केली जात आहे.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गटही सहभागी झालेला आहे. काँग्रेस यासाठी कितपत तयार होते यावरच शहरातील आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

शिवसेनेचे विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांना याकरिता शिवसैनिकांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. 1190पासून तर 2014 पर्यंत शिवसेना भाजपची युती होती. सुरुवातीला सहापैकी दोन मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आले होते. पूर्व नागपूरमधून ज्ञानेश्वर वाकुडकर, प्रवीण बरडे, शेखर सावरबांधे हे निवडणूक लढले. या सर्वांनी काँग्रेसच्या तत्कालीन उमेदवाराच्या विरोधात चांगलाच लढा दिला होता. मात्र यश आले नाही.

त्यानंतर पूर्व सोडून दक्षिण नागपूर शिवसेनेला देण्यात आले. येथून किशोर कुमेरिया, किरण पांडव हे निवडणूक लढले. त्यानंतर आजवर मतदारसंघ जिंकता आला नाही. हे बघता आता मध्य नागपूर शिवसेनेला सोडावे, अशी मागणी शहराचे संघटक किशोर पराते यांनी केली आहे.

मध्य नागपूरमध्ये सलग तीन निवडणुकीत आमदार विकास कुंभारे निवडून आले आहेत. माजी मंत्री अनिस अहमद यांच्यानंतर काँग्रेसला हा मतदारसंघ जिंकता आला नाही. मध्य नागपूरमध्ये मुस्लिम, हलबा तसेच अनुसूचित जाती जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर या समाजाने लोकसभेच्या निवडणुकीत विश्वास दाखवला आहे. अशा परिस्थिती उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटासाठी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ सोडल्यास नागपूर शहरात आणि संघ मुख्यालय असलेल्या स्थळी ऐतिहासिक विजय मिळू शकतो असेही पराते यांनी म्हटले आहे.

काँग्रेस(Congress) शहरातील सर्व सहा मतदारसंघातून आजवर निवडणूक लढवत आली आहे. पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असतानाही त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडण्यात आला नव्हता. आता आघाडीत ठाकरे गटही सहभागी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. ठाकरे गटाच्यावतीने मध्य नागपूर मागितल्या जात आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस शहरातील एकही जागा सोडण्यास तयार नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com