BJP Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

BJP vs Congress Chandrapur : 'आम्हाला राम प्रिय, ते ‘रम' प्रिय'; मुनगंटीवारांकडून वडेट्टीवारांचा हिशोब चुकता...

Chandrapur Municipal Election: चंद्रपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तोंडसुख घेताना दिसत आहे.

Rajesh Charpe

Chandrapur Municipal Election : "रामायण काल्पनिक आहे. राम हा अस्तित्वातच नव्हता या विचारांचे काँग्रेस नेते आहेत. राम सेतूचे अस्तित्वही त्यांना मान्य नाही आणि रामावर आस्था नाही. ते आधीपासूनच रावणप्रिय आहेत. मात्र आम्ही रामभक्त आहोत. त्यामुळे रामकथा एकणारच. आमच्या वाट्याला याल तर खबरदार! तुमच्यावर रामभक्त भारी पडल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

यावेळी त्यांनी दारूची दुकाने उघडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना चंद्रपूर महापालिकेची सत्ता हवी असल्याचा आरोप करून वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.

मागील आठ दिवसांपासून चंद्रपूरमध्ये काँग्रेस (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तोंडसुख घेताना दिसत आहे. त्यांच्या भाषणातील दाखले आणि उदाहरणे सोशल मीडियावर चांगलेच गाजत असून मनोरंजनही करीत आहे. या सर्व भाषणांचा मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला.

ते म्हणाले, "आम्ही रामभक्त आहोत आहोत. आमची रामावर आस्था आहे. काँग्रेसचा एकही नेता चंद्रपूर शहराच्या विकासावर बोलताना दिसत नाही. त्यांना चंद्रपूर महापालिका फक्त दारू दुकानांना एनओसी देण्यासाठी पाहिजे आहे. आमची सत्ता येणारच आहे." यापुढे चंद्रपूर शहरात दारू दुकान आणि एकाही बिअर शॉपिला एनओसी दिली जाणार नाही, अशी घोषणाही सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली.

महात्मा गांधी यांची काँग्रेस केव्हाच संपली आहे. आता त्यांना मत मागण्यासाठी गौतमी पाटील यांना आणावे लागत आहे. याकरिता त्यांनी गौतमी पाटील या ओबीसी असल्याचे सांगून त्यांची जातही बदलून टाकली. एवढी दैना या पक्षाची झाली आहे. गौतमी पाटील एक दिवस येऊन निघून जाईल. या शहराचा विकास कोण करणार? गौतमी पाटील यांना बघून तुम्ही मत देणार का? असा सवालही त्यांनी केला.

भाजप आमदारांमधील भांडणामुळे मुख्यमंत्र्यांना आता त्यांना सुधीर कमळ बघ, किशोर कमळ बघ, असे म्हणावे लागत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली होती. याचाही समाचार त्यांनी घेतला. ते म्हणाले, "आम्ही जन्मलो तेव्हापासूनच कमळ बघत आहोत. कमळाला राष्ट्रीय फुल म्हणून काँग्रेसनेच दर्जा दिला आहे. त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांना भविष्यातील त्यांचे नेते करंटे निघतील आणि त्यांना कमळाकडे बघण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार असे त्यावेळीच उमगले असावे."

काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कमळ हाती धरले आहे. आता त्यांच्या समर्थकांची पाळी आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी आतापासूनच छगन कमळ बघ, बबन कमळ बघ, मगन कमळ बघ हे धडे गिरवावे, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. यावेळी त्यांनी वडेट्टीवार यांनी पायजामाची उपमा देऊन चंद्रपूर शहराचा अपमान असल्याचेही सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT