BJP Sujay Vikhe Patil : 'माझा माज कोणीच मोडू शकत नाही, तसा अजून...'; सुजय विखेंची तुफान फटकेबाजी

Ahilyanagar Municipal Election: BJP Sujay Vikhe Patil Fiery Speech in Kedgaon Campaign : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी केडगाव इथल्या प्रचार सभेत भाजपचे सुजय विखे पाटील यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली.
BJP Sujay Vikhe Patil
BJP Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा प्रचार उपनगरांमध्ये चांगलाच गाजतो आहे. भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रचारासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील अन् राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पायाला भिंगरी लावली आहे. प्रचार सभांमधून दोघं तुफान राजकीय फटकेबाजी करत आहेत.

केडगाव इथं सुजय विखे पाटील यांनी केलेलं भाषण तुफान गाजत आहे. त्यात त्यांनी, 'मी खासदारकीला पडलो म्हणून, काही लोकांना वाटलं की, याचा माज मोडला गेला. पण माझा माज कोणीच मोडू शकत नाही. तसा माणूस जन्माला यायचा. माझा माज मोडला गेलेले लोक, त्यांनी स्वतःचा मोडून घेतला,' अशी सुजय विखे पाटलांनी टोलेबाजी केली.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप (BJP)-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शहर पिंजून काढत आहे. प्रचार सभांमधून विरोधकांची चाचपणी करत आहेत. यातच केडगावमध्ये सुजय विखे पाटलांनी केलेलं भाषण तुफान गाजत आहे.

महापालिकेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) लोकसभा निवडणुकीतील पराभवावर वारंवार भाष्य करत आहेत. विरोधकांना सूचक इशारा देत आहे. 2029मध्ये आपणच पुन्हा खासदार होणार आहोत, अन् पुढच्याची अनामत रक्कम जप्त होईल, असं नियोजन सुरू असल्याचे संकेत देत आहेत.

BJP Sujay Vikhe Patil
Annamalai On Raj Thackeray Challenge : 'मी मुंबईत येणारच… हिंमत असेल तर अडवा!' अण्णामलाईंचं ठाकरेंना थेट आव्हान

खासदारकीच्या पराभवावर बोलताना, सुजय विखे पाटील म्हणाले, "सुजय विखे खासदार राहिला नाही, त्यामुळे काहींना वाटले की, आपण काहीतरी चमत्कार करून टाकला. माध्यमांमध्ये विखे पाटलांचा पराभव... विखे पाटलांचा पराभव.., असं रंगवलं गेलं. पण वाईट काळ प्रत्येकावर येतो, ज्या लोकांनी सुजय विखेला पाडलं त्यांना पुढच्या सहा महिन्यांमध्ये, सगळ्या लोकांना घरी बसवलं, त्यांना पाडून तुमच्यासमोर उभा राहिला तो सुजय विखे!"

BJP Sujay Vikhe Patil
BJP criticism Akola : भाजप उमेदवार मटका किंग? ठाकरेंच्या शिलेदाराचा स्फोटक आरोप; ‘खोटं ठरल्यास आमदारकी सोडणार!’

मी सर्वांना मोकळं केलं

'लोक म्हणायचे, हा पडणार नाही, तो पडणार नाही, मला पण काहीतरी दाखवावा लागेल, मी नेहमी म्हणतो, माझ्यासारखं माणूस मोकळा बसवणे, सर्वात घातक. मला मोकळं केलं, मी सर्वांना मोकळं केलं. मी काहीच ठेवलं नाही. माझी चूक आजही मला कळालेली नाही,' असा टोला विखे पाटील यांनी लगावला.

बटन वर-खाली लावतो

'एक वार आलं, लाट आली आणि अहिल्यानगर जनतेच्या समोर एक चित्र निर्माण केलं गेलं, एक सर्वसामान्य उमेदवाराचे चित्र. मी गरीब आहे, बटन वर-खाली लावतो, झाडू लावतो, फावडा घेऊन फिरतो, कोविडच्या काळात पाठीवर औषधाचे भांडे घेऊन, औषध मारतो, ही काय खासदाराची कामे आहेत का? एक भाव निर्माण केला गेला, राजाविरुद्ध सर्वसामान्यांची लढाई उभी केली गेली, आज दीड वर्ष झाले, खासदारांनं एक रुपया सुद्धा केडगावकरांसाठी दिला नाही. मी माजी खासदार असून, केडगावकरांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी आणून दिला,' असे म्हणत, सुजय विखे पाटलांनी खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता निशाणा साधला.

माझा माज कोणीच...

'लोकांना वाटलं की, याचा माज मोडला गेला. पण माझा माज कोणीच मोडू शकत नाही. तसा माणूस जन्माला यायचाय, माझा माज मोडला गेलेले लोक, त्यांनी स्वतःचा माज मोडून घेतला. पण मी खचलो नाही,' अशी तुफान टोलेबाजी सुजय विखे पाटलांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com