Bhandara Gondia News: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती वा महाविकास आघाडीत राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. कुठे कुरघोडी तर कुठे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी,फोडाफोडीचा धसका या सगळ्यांमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. याचदरम्यान,भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आखाड्यातून मोठी अपडेट समोर आली. यामुळे महायुतीनंही दगाफटक्याचा धसका घेतल्याचं दिसून येत आहे.
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राज्याचे महसूल मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीनं भंडारा जिल्ह्याचा दौरा केल्याचं समोर येत आहे. या दौऱ्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सुमारे एक तासांच्या भेटीमागं भंडारा- गोंदिया स्थानिक विधानपरिषद निवडणुकीतील'डॅमेज कंट्रोल'साठीची धावाधाव हेच कारण असल्याचं बोललं जात आहे.
कारण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भंडारा दौरा अतिशय गोपनीय ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे या दौऱ्याचा अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्येही समावेश नव्हता. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याशी तासभर चर्चा केला.या चर्चानंतर बावनकुळेंनी पुन्हा एकदा नागपूर गाठले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे काहीसे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्यात भर म्हणजे भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानासुद्धा भोंडेकर यांनी दांडी मारली होती.
एकीकडे महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार असलेल्या अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारातही युतीधर्माचं पालन होताना दिसून येत नाही. त्याचमुळे कुठेतरी भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली असून आहे. भोंडेकर आणि त्यांची शिवसेना भंडारा आणि गोंदिया या दोन्हीही जिल्ह्यांतही फारसे सक्रीय नसल्याचं पाहायला मिळत आहे.
भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं विधान परिषद निवडणुकीत फार मोठं संख्याबळ नाही. पण तरीदेखील महायुतीकडे निवडणुकीसाठी मतांचा पुरेसा कोटाही आहे. मात्र,मताधिक्याच्या आधारे निवडणूक महायुतीच्या उमेदवारासाठी सोपी दिसून येत असली तरी पडद्यामागं घडलेल्या मोठ्या घडामोडींमुळे ती महायुतीचा कस पाहणारी ठरण्याची शक्यता आहे.
तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पुरस्कृत उमेदवार नरेंद्र ईश्वरकर हे भंडारा- गोंदिया विधानपरिषद निवडणुकीसाठी रिंगणात आहे. सध्याजरी महाविकास आघाडीकडे महायुतीच्या तुलनेत तुल्यबल मताधिक्य नसलं तरी ईश्वरकर यांना या निवडणुकीत काहीतरी चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. उमेदवारी जाहीर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.