Crime News: मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक घटना, सुरक्षा दल जवानाच्या पत्नीसोबतच भयंकर कांड; बलात्कार, जादूटोणा, 'निकाह' अन्...

Forced religious conversion case: नाशिकच्या टीसीएस (TCS) बीपीओ मधील सक्तीच्या धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाच्या खळबळजनक प्रकरणानंतर आता मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एका नामांकित बँकेच्या शाखेतूनही असाच प्रकार समोर आला आहे.
Nagpur Conversion Crime
Nagpur Conversion Crime Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात एकीकडे नाशिक टीसीएस,आणि मुंबईतील एका नामांकित बँकेतील महिलांवरील अत्याचार आणि धर्मांतराच्या घटनांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे.

नागपूरमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीनं एका 24 वर्षीय तरुणीला पेयातून गुंगीचं औषध देत तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढले. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं संबंधित महिलेला धमकी देत, ब्लॅकमेल करत 4 लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.

या प्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार,सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रिअल इस्टेट व्यावसायिक आरोपी अय्याज मदारे याच्यासह आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बळजबरी धर्मांतरणाचा मुद्दा पुढे आला आहे.

नागपूर शहराबाहेर ड्युटीवर असलेल्या एका सुरक्षा दलातील जवानाच्या पीडित विवाहित महिलेसोबत तिच्या शाळेतील व आरोपी अय्याज मदारे याने तिच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यानं त्याच्या मित्रासाठी मालमत्ता खरेदी करण्याच्या बहाण्यानं पीडितेसोबत पुन्हा मैत्री केली. महिलेचाही रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याची माहिती समोर येत आहे.

Nagpur Conversion Crime
NCPI News: विधानसभेत फक्त 822 मते; एका झटक्यात आता 20 खासदार! NCPIला राजकीय लॉटरी; पक्ष अचानक चर्चेत कसा आला?

यानंतर आरोपी अय्याजनं एका हॉटेलमधील बैठकीदरम्यान 8 फेब्रुवारी 2025 रोजी पीडित महिलेला पेयामधून गुंगीचे औषध दिलं.यानंतर तिची शुध्द हरपली. ज्यावेळी तिला जाग आली, तेव्हा आरोपीनं तिचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडीओ शूट केले होते.

हे व्हिडीओ सुरक्षा दलात तैनात असलेल्या पतीला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता. पीडित महिलेनं भीतीपोटी आरोपीला तब्बल 4 लाख रुपये दिल्याचा आरोपही महिलेनं पोलिसांत तक्रारीत केला आहे.

Nagpur Conversion Crime
US Iran Peace Deal : अखेर संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला! ट्रम्प यांच्याकडून युद्ध संपल्याची घोषणा, इराणचीही सहमती, 'या' तारखेला अधिकृत सह्या होणार

याप्रकरणात एक खळबळ उडवणारा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत आरोपीने विवाहित महिलेचे दोन्ही हात पकडत काही धार्मिक वाक्य उच्चारताना दिसून येत आहे. पोलिसांनी आता संबंधित व्हिडीओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.

यानंतर 31 मे रोजी आरोपी व त्याच्या साथीदारानं पीडितेला महिलेला बळजबरीनं कळमेश्वर येथे नेले. याठिकाणी या प्रकरणातील तिसरा आरोपी असलेल्या हजरत मौलाना याच्याकडून काही धार्मिक विधी करत 'कबुल है, कबुल है'म्हणत निकाह करण्यास दबाव आणल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

तसेच पीडित महिलेला यावेळी बळजबरीने मांस खाण्यास दिले. यानंतर संबंधित आरोपींनी तिला हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी मुख्य आरोपी अय्याजने पुन्हा महिलेवर बलात्कार केला.यानंतरही आरोपी तिच्या घरी यायचा व तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिला सुरुवातीला पीडित महिलेनं भीतीनं कोणालाही याबद्दल काही सांगितलं नाही.

Nagpur Conversion Crime
MLC Election : नाशिकचे सगळे नगरसेवक भिंवडीतील त्या रिसॉर्टवर एकत्रित आणले जाणार; CM फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

यानंतर आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं तिच्या पतीला याविषयी माहिती दिली. यानंतर आता याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेतील विवाहित महिला व आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचंही पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. संबंधित महिला ही नागपूर शहरात राहणारी असून आरोपी हा तिचा शाळेतील आहे.

नाशिकच्या टीसीएस (TCS) बीपीओ मधील सक्तीच्या धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाच्या खळबळजनक प्रकरणानंतर आता मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एका नामांकित बँकेच्या शाखेतूनही असाच प्रकार समोर आला आहे. एका पीडित महिलेच्या पतीने राजस्थान पोलिसांत आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता नागपूरमधूनही धर्मांतराची ही घटना समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com