Chandrashekhar Bawankule on Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News: चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला टोला, म्हणाले 'अनिल देशमुखांची ‘डायरी‘ म्हणजे...'

Chandrashekhar Bawankule on Anil Deshmukh Diary : '...त्यामुळे देशमुख कुठल्या हेतूने डायरी प्रकाशित करीत आहे हे सांगण्याची गरज नाही.' असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

Rajesh Charpe

Vidhan sabha Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ‘डायरी ऑफ होम मिनिस्टर' प्रकाशित करणार आहेत. यातून ते अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तर या पुस्तकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, रिकामटेकडेपणातील उद्योग अशा शब्दात देशमुख्यांच्या डायरीची खिल्ली उडवली आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. तेव्हा त्यांनी तत्कालीन मुंबईचे पोलिस आयुक्तांना बार मालकांकडून शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप झाला होता. त्यामुळे देशमुखांना गृहमंत्रीपद सोडावे लागले होते. ईडीने त्यांना अटकही केली होती व ते सुमारे 14 महिने ते जेलमध्ये होते.

त्यानंतर देशमुखांनी बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले होते, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात शपथपत्र लिहून देण्यास सांगितले होते, असा आरोप केला होता.

याशिवाय १४ महिने जेलमध्ये असताना आपल्या विरोधात काय काय षडयंत्र रचण्यात आले होते, पोलिसांवर कोण दबाव टाकत होते? याचा सविस्तर खुलासा आपण डायरीतून करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा सर्व रोख राज्याचे उपमुख्यमंत्री व विद्यामान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. तर देशमुखांच्या डायरीमुळे राज्यात मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ते १४ महिने तुरुंगात होते, बराच रिकामा वेळ होता म्हणून काही तरी लिहले असावे. अशा पुस्तकाला समाजाची मान्यता नसते. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे देशमुख कुठल्या हेतूने डायरी प्रकाशित करीत आहे हे सांगण्याची गरज नाही. हा केवळ निवडणुकीचा स्टंट असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

भाजपच्या(BJP) जागावाटपावरसुद्धा बावनकुळे यांनी भाष्य केले. महायुतीत कोणी नाराज नाही. फक्त आठ ते दहा जागावाटप शिल्लक राहिले आहे. साकोलीत भाजपचाच उमेदवार असेल. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व उमेदवार 28ऑक्टोबरला एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहोत. नीलेश राणे आणि राजकुमार बडोले पक्ष सोडून जात असले तरी त्याने काही फरक पडत नाही. आमच्याकडे सक्षम अमेदवार आणि नेते असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT