Nagpur News : प्रसिद्ध अभिनेते सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला असताना इतक्या लवकर त्यांना इस्पितळातून सुटी कशी मिळाली अशा सवाल मत्स्यपालन मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. याकडे लक्ष वेधून राणे यांनी एकूणच हल्ल्यावरच शंका उपस्थित केली होती. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.
यावर भाजपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉक्टरांच्या उपचारावर शंका घेण्याची गरज नाही असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले. मात्र त्यांनी राणे यांनी उपस्थित केलेला प्रश्नामुळे शंकेला वाव असल्याचेही सांगितले. हे बघता आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सैफ अली खानच्या घरात घुसून त्यांना एक कोटी रुपयांची मागणी केली होती. यास विरोध केल्याने त्याने सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्या हातातील चाकूमुळे सैफ अलीच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. चाकूचा एक तुकडा त्याच्या गळ्यात अडकला होता. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. इतका प्राणघातक हल्ला झाला असताना इतक्या लवकर त्यांना सुटी कशी देण्यात आली असा सवाल नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला होता.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. तो बांगला देशाचा नागरिक असल्याचे सांगण्यात येते. अवैधपणे तो भारतात आला. मुंबईत त्याने एक बारमध्ये काम केल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या बांगला देशतील घुसखोरांवर मोठी चर्चा सुरू आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
अमरावती जिल्ह्यात अवैधपणे राहणाऱ्या बांगला देशी नागरिकांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ते स्वतः याकरिता अमरावती येथे येऊन गेले. त्यानंतर प्रशासनाच्याने छाननी केली जात आहे. नागपूरमध्येही सुमारे चार हजार एक झुडपी जंगलाच्या जागेवर बांगला देशी वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. भंगारचा व्यवसाय करणाऱ्या बांगला देशीकंडे पश्चिम बंगालचे आधारकार्ड असल्याचे समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.