
कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. एकीकडे पर्यटकांची गर्दी वाढत असताना शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांसह शहरातील उपनगरात असणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. शहरालगत वाढलेल्या ग्रामीण भागातील उपनगरातील कचऱ्याने पर्यटकांचे स्वागत होत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yegde) यांनी आता थेट सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दैनंदिन वाढणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग ग्रामपंचायतीवर कारवाई केली जाणार आहे. तर थेट सरपंचांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून असे 46 ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत. करवीर तालुक्यातील 14 तर हातकणंगले तालुक्यातील चार ग्रामपंचायत मधील आहेत. ग्रामपंचायतीकडून कोणतेच कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात नसल्याने घरात येणाऱ्या अशा 46 ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आढळून आले आहे. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामसेवक आणि सरपंचांची बैठक घेत कडक शब्दात इशारा दिला आहे.
ज्या ठिकाणी कचरा पडतो त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीने कचऱ्यासाठी व्यवस्था करावी. निश्चित केलेल्या 46 ठिकाणी पुन्हा कचरा दिसता कामा नये. जर रस्त्यावर कचरा पडल्यास सरपंचावर थेट कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. दरम्यान जिल्हाधिकारी इतक्यावरच न थांबता रोज या ठिकाणावरील क्षणचित्रे जीपीएस द्वारे पाहणी केली जाईल असंही सांगण्यात आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.