Chandrashekhar Bawankule On Lalkrushna Advani Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : अडवाणींना भारतरत्न मिळणे देशासाठी आनंदाचा क्षण

Lalkrushna Advani : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले सरकारचे कौतुक

Atul Mehere

Celebration in BJP : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याने संपूर्ण देशभरात आनंद साजरा होत आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरासाठी अडवाणी यांनी पुढाकार घेतला. त्यांनीच कोर्टात पुरावे सादर केले. लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी रथयात्रा काढली. त्यामुळे त्यांना सरकारने प्रदान केलेला भारतरत्न पुरस्कार योग्यच असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

‘आज आमच्यासाठी, संपूर्ण देशवासीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. या देशात समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळत आहे. भाजपचे नेते म्हणून शून्यातून जगातील सर्वांत मोठा पक्ष होण्यामध्ये लालकृष्ण अडवणी यांचे योगदान मोलाचे आहे’, असे बावनकुळे म्हणाले.

गणपत गायकवाड यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, अशा पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रात होऊ नये. गणपत गायकवाड यांची चूक असेल तर प्रशासन तसा निर्णय घेईल. कारवाई केरेल. समाजात दहशत निर्माण होईल असे वातावरण तयार होऊ नये, राज्याच्या प्रतिमेला त्यामुळे मोठे नुकसान पोहचेल असे वागू नये. यासंदर्भात विरोधी पक्ष विनाकारण भांडवल करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिज, असे बावनकुळे म्हणाले.

गणपत गायकवाड म्हणतात की त्यांनी जीवाच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलले आहे. चूक कोणाची या निष्कर्षावर जात येत नाही. अशा घटनांमुळे समाजात वाईट संदेश जातो. जी घटना झाली ती चुकीची आहे. त्यावर कारवाई व्हावी, अशी आपली भूमिका असल्याचे ते म्हणाले. गणपत गायकवाड मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलले आहेत. ते जे काही बोलले गेले नक्कीच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत जाईल. ज्याची चूक असेल तो भाजपचा नेता असो किंवा कोणीही असो कारवाई होईल. भाजपला अशा घटना अपेक्षित नाहीत. असे आमचे संस्कार नाहीत. काय घडले हे बघावे लागेल. त्यातूनच पुढे निर्णय घ्यावा लागेल. आपण यासंदर्भात माहिती घेतली. त्यावेळी असे कळले की जीवावर बेतणार असल्याने गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे भाजप अडचणीत येण्यापेक्षा समाजाला काय वाटते हा विचार जास्त महत्त्वाचा आहे. समाजमनाची भाजपला चिंता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची चिंता आहे. लोकप्रतिनिधीकडून असे घडणे अपेक्षित नाही आहे. सरकार आणि गृहखाते याचा सखोल तपास करेल व अशी घटना घडू नये, यासाठी प्रयत्न करेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT