Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : पराभवानंतर बावनकुळे उतरले मैदानात; विधानसभा जिंकण्याच्या दिल्या टिप्स

Rajesh Charpe

Nagpur Political News : रामटेक लोकसभा मतदारसंघात झालेल्या धक्कादायक पराभवानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेकमधील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारा, नव्याने विचार करा आणि आगामी विधासभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी कामाला लागा, असे सांगून ते पुन्हा रामटेकच्या आखाड्यात उतरले आहेत.

रामटेक लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपने सर्वे केला होता. या आधारावर माजी खासदार कृपाल तुमाने Krupal Tumane यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

निवडणूक लढण्यासाठी त्यांनी काँग्रेसमधून शिंदे सेनेत पराभव केला होता. निवडणूक निकालानंतर तुमाने यांनी बावनकुळे यांचा उल्लेख व्हिलन असा करून खळबळ उडवून दिली होती. बाहेरचा उमेदवार लादल्याने काँग्रेसच्यासुद्धा कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला होता.

महाविकास आघाडी जिंकल्यानंतर काँग्रेसचे नेते आता भाजपला खुले आव्हान देऊ लागले आहेत. केदारांनी हिंगण्यात भाजपचा पराभव करण्याच विडा उचलला आहे. कार्यकर्त्यांचे होणारे खच्चीकरण थांबवण्यासाठी बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी आता बैठकांना सुरुवात केली आहे.

त्यांनी रामटेक, उमरेड व हिंगणा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी झालेला चुका विसरा. नव्याने कामाला सुरुवात करा. बूथ प्रमुख, सुपर वॉरियर्स आणि शक्ती केंद्रप्रमुखांनी भाजपाचे विचार व सरकारची कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचवा. नव मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करा.

मतदार याद्यांमधून गहाळ झालेली नावे शोधा. त्यांचा पुन्हा याद्यांमध्ये समावेश करा. उमेदवार कुणीही असला तरी देखील तो महायुतीचा घटक आहे. त्यास विजयी करण्याची जबाबदारी उचला असे सांगितले.

यावेळी भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार समीर मेघे, माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, मल्लिकार्जुन रेड्डी, अरविंद गजभिये, अविनाश खडतकर, उदयसिंग यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT