Chitra Wagh on Sanjay Rathod Sarkarnama
विदर्भ

Chitra Wagh and Sanjay Rathod News : संजय राठोडांच्या प्रचारासाठी चित्रा वाघ जाणार का? ; जाणून घ्या, त्यांचं रोखठोक उत्तर!

Mahayuti Politics News : महायुतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली असून त्यानुसार आपल्या नेत्यांना प्रचारसभांचा कार्यक्रम दिला आहे.

Mayur Ratnaparkhe

Chitra Wagh and Vidhansabha Election 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानास अवघे काही दिवस शिल्लक असून प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी उमेदवारांच्या प्रचारकार्यात व्यस्त आहेत. पक्षाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रचारसभा, बैठका, रॅली, मेळावे आदींची सपाटा सुरू आहे. यंदाची निवडणूक अतिशय वेगळी आहे. याला कारण मागील काळात राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी आहेत.

राज्यात भाजप(BJP), शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती सत्तेत आहे. तर विरोधात महाविकास आघाडी आहे. दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात चुरस बघायला मिळत आहे. अशावेळी प्रचारातही जोर चढलेला दिसत आहे. दरम्यान महायतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपनेही निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली असून त्यानुसार आपल्या नेत्यांना प्रचारसभांचा कार्यक्रम दिला आहे.

भाजपच्या आमदार चित्रा वाघ(Chitra Wagh) देखील सध्या प्रचारासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्यातील टोकाचा वाद हा सर्वश्रूत आहे. यवतमाळमधील एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र नंतरच्या कालावधीत राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि आता चित्रा वाघ आणि संजय राठोड हे दोघेही महायुतीमधील प्रमुख घटक पक्षात दिसत आहेत.

अशावेळी आता चित्रा वाघ महायुतीचे यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न त्यांना अकोला येथे माध्यम प्रतिनिधीकडून विचारण्यात आला असता त्यांनी म्हटले की, 'तुम्ही काही प्रश्न असे विचारता, तुम्हालाही माहिती आहे याचं माझं उत्तर काय असणार आहे. आम्ही अतिशय गांभीर्याने ही निवडणूक लढवतो आहे. ही काही मजाक नाही किंवा मस्करी नाही. त्यामुळे आमच्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जिथे जिथे गरज आहे, त्या त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पोहचणार.'

तसेच, 'आम्हाला कार्यक्रम दिलेले आहेत. मी येथून मोशीला चालले आहे. कालापासूनच मी विदर्भात दौरा सुरू केला आहे. ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम आलेले आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत.' असंही त्यांनी याआधी सांगितलं. अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT