Sanjay Rathod Video : पालकमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Sanjay Rathod car accident : अपघातामध्ये पिकअपचालक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. संजय राठोड याचा कारचालक देखील जखमी आहे. सुदैवाने मंत्री संजय राठोड जखमी झाले नाही. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Sanjay Rathod car accident
Sanjay Rathod car accident sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Rathod News : यवतमाळाचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात शुक्रवारी (ता.4) पहाटे दोनच्या दरम्यान कोपरा या गावात झाला. पोहरागड इथून यवतमाळकडे पालकमंत्र्यांचा ताफा जात असताना पालकमंत्र्यांच्या कारने पिकअपला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की पीकअप जागेवर पलटी झाला आणि पालकमंत्र्यांच्या कारचा पुढील भागा चक्काचूर झाला.

या अपघातामध्ये पिकअपचालक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. संजय राठोड यांच्या कारचे एअर बॅग उघडल्याने सुदैवाने मंत्री संजय राठोड जखमी झाले नाहीत. मात्र त्यांचा चालक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पोहरागड इथे उद्या (शनिवारी) पंतप्रधान मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंगारा म्युझियमचे उद्घाटन होणार आहे. त्याच्या तयारी अंतिम टप्प्यात असताना पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळकडे येत असताना दिग्रस ते आर्णी मार्गावरील कोपरा या गावात त्यांच्या भरधाव कारने पीकअपला मागून जोरदार धडक दिली.

Sanjay Rathod car accident
Ichalkaranji BJP News : इचलकरंजीत भाजपला धक्का? माजी जिल्हाध्यक्षांनी घेतली शरद पवारांची भेट!

या अपघातामध्ये पीकअपमध्ये असलेली केळी रस्त्यावर पडली. पीकअपचालक गंभीर जखमी झाला. मंत्री संजय राठोड यांनी व्यापाऱ्याचा नुकसान होऊ नये म्हणुन रस्त्यावर पडलेली केळी दुसर्‍या वाहनात टाकून पोहरागड इथे पाठविल्याची माहिती आहे. तसेच जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Sanjay Rathod car accident
Raj Thackeray on Marathi : मायबोली मराठीला 'अभिजात' भाषेचा दर्जा मिळताच राज ठाकरेंची खास प्रतिक्रिया, म्हणाले..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com