मुंबई : आरोप आम्हालाही करता येतात. पण आम्ही करत नाही. तुम्ही तीन-चार आरोप आमच्यावर केले, मात्र, त्यात ‘खोदा पहाड, निकाल चुहा’ मधील चुहाही सापडला नाही. आम्ही जेव्हा काढायला जाऊ, तर... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अर्ध्या वाक्यातूनच विरोधकांना (opposition) अप्रत्यक्षपणे इशारा (warning) दिला. आम्ही काही शोधाशोध करणार नाही; पण तुमची इच्छा असेल तर आम्ही शोधूही शकतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना थेट इशाराच देऊन टाकला. (CM warns opposition again: 'We can find your cases too')
दरम्यान, विरेधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप करत त्यांचा राजीनामा मागितला होता. त्यावेळी दिल्लीत असलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेत्यांची, विरोधी पक्षांची प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर विधानसभेत आज बोलताना पुन्हा एकदा विरोधकांना सुनावले.
समृद्धी महामार्गामुळे सर्वांची समृद्धी झाली. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची काही लोकांना घाई होती. मात्र, ते नियतीला मान्य नव्हते. नियतीलाही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाहिजे होते. मुख्यमंत्री बोलत असताना पाठीमागून समृद्धीचा गोसे खुर्द होऊ द्यायचा नव्हता, अशी कमेंट केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ए बाबा, तू आता काय तरी सांगू नको रे बाबा’ यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ‘आता सरकार तुमचं आहे, शोधा ना काय झालं ते’ असे म्हणून आव्हान दिले. त्यावर ‘शोधाशोध करत नाही हो दादा, सगळं आहे आमच्याकडं, आम्ही शोधतोय कुठे,’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
या सर्वांवर गप्प बसतील ते फडणवीस कसले? त्यांनीही गोसे खुर्दवरून अजित पवार यांना टोमणा मारला. ‘दादा, तुम्ही २००४ मध्ये आलात, गोसे खुर्द धरणाची सुरुवात १९८२ मध्ये झाली, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी संधी साधत ‘गोसे खुर्द धरणाची सुरुवात खूप आधी झाली आहे, तुम्ही कशाला अंगावर घेताय’, असे म्हणत पवारांना चिमटा काढला. (त्यावर सत्ताधारी बाकावर हस्याची लकेर उमटली)
आरोप तर आम्हालाही करता येतात. आम्ही करतोय का. त्यावर जितेंद्र आव्हाड बोलले. त्यांना उद्देशून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अरे बाबा जितेंद्रजी, ऐका तुम्ही, आता तुम्ही तीन चार आरोप केले. काय निघालं, त्याच्यामध्ये ‘खोदा पहाड, निकला चुहा’ या म्हणीतील चुहा सुद्धा निघाला नाही. आम्ही जेव्हा काढायला जाऊ, तर... मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या वाक्यातूनच विरोधकांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला. अर्ध्या माहितीवर प्रश्न उपस्थित केला तर असं होतं. ठीक आहे जाऊ द्या. आम्ही काय शोधाशोध करणार नाही. पण तुमची इच्छा असेल तर आम्ही शोधूही शकतो, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.