Devendra Fadnavis :अजित पवारांच्या भाषणातील अर्धे भाषण जयंत पाटलांचे वाटत होते : फडणवीसांचा चिमटा

जयंतराव सभागृहात नसल्यामुळे अर्धे भाषण त्यांनी लिहून दिले, असा भास दादा तुमच्या भाषणातून होत होता.
Ajit Pawar, Jayant Patil, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Jayant Patil, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे विधानसभेत जे भाषण झालं. ते शंभर टक्के अजित पवार यांचे वाटत नव्हते. त्यातील ५० टक्के भाषण जयंतरावांचंदेखील (जयंत पाटील Jayant Patil) वाटत होतं. जयंतराव सभागृहात नसल्यामुळे अर्धे भाषण त्यांनी लिहून दिले, असा भास दादा तुमच्या भाषणातून होत होता, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला. (Ajit Pawar's Half of speech seemed to be Jayant Patil's : Fadnavis)

अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिले. त्या वेळी जयंत पाटील यांच्या अनुषंगाने फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Ajit Pawar, Jayant Patil, Devendra Fadnavis
'अजितदादा, संधी असतानाही पवारसाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही' : फडणवीसांनी ठेवले दुखऱ्या नसेवर बोट

फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांना मी गेली अनेक वर्षांपासून ओळखतो. ते रोखठोक भाषणासाठी ओळखले जातात. मात्र, आज जे भाषण झालं. ते शंभर टक्के अजित पवार यांचे वाटत नव्हते. त्यातील ५० टक्के भाषण जयंतरावांचंदेखील (जयंत पाटील) वाटत होतं. जयंतराव सभागृहात नसल्यामुळे अर्धे भाषण त्यांनी लिहून दिले, असा भास दादा तुमच्या भाषणातून होत होता.

Ajit Pawar, Jayant Patil, Devendra Fadnavis
पंढरपूरचा कॉरिडॉर कोणाची आमदारकी घालवणार..? कोणत्या नेत्याला आमदार करणार?

विधानसभेत अपशब्द वापरल्यामुळे जयंत पाटील यांचे विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन संपेपर्यंत म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या काळात त्यांना नागपूर आणि मुंबई विधीमंडळाच्या आवारात प्रवेश करता येत नाही, त्यामुळे जयंत पाटील सध्या विधानसभेच्या बाहेर आहेत.

Ajit Pawar, Jayant Patil, Devendra Fadnavis
देशमुखांच्या स्वागतासाठी रॅली; राष्ट्रवादी युवक अध्यक्षांसह १०० जणांवर गुन्हा दाखल

मुख्यमंत्रीपदावरून चिमटा काढला

अजितदादांनी भाषणात अनेक गोष्टी सांगितल्या. कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले. पण एका गोष्टीचं दुःख आहे. संधी मिळालेली असतानाही पवारसाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. तुम्हाला २००४ मध्ये संधी होती. तुमचे (राष्ट्रवादी काँग्रेसचे) जास्त आमदार निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री असा होता. पण, ती संधी काय तुम्हाला मिळाली नाही. पण जाऊद्या मी त्यावर जास्त काही बोलत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com