पंढरपूरचा कॉरिडॉर कोणाची आमदारकी घालवणार..? कोणत्या नेत्याला आमदार करणार?

पंढरपूरबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रशासकीय नेतृत्व, संवाद कौशल्य, समोरच्याला सहमत करण्यासाठी कमी पडताना दिसत आहेत. कॉरिडॉरसाठी मुंडे, गेडाम यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज
Prashant Paricharak, Bhagirath Bhalke, Abhijit Patil, Samadhan Autade
Prashant Paricharak, Bhagirath Bhalke, Abhijit Patil, Samadhan AutadeSarkarnama

सोलापूर : पंढरपूरचा (Pandharpur) विकास हा सर्वच राजकीय पक्षांसाठी, मुख्यमंत्र्यांसाठी लाडका आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला कनेक्‍ट करण्याची ताकद असल्याने पंढरपूरला अध्यात्मासोबतच केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणातही महत्त्व आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथांच्या धर्तीवर पंढरपुरात आणलेल्या कॉरिडॉरला (Corridor) होणाऱ्या विरोधात अनेक कारणे दडली आहेत. राज्याच्या राजकारणात आजपर्यंत पंढरपूरची ओळख सांगणारे (स्व.) सुधाकरपंत परिचारक (Sudhakarpant Paricharak) आणि (स्व.) भारत भालके (bharat Bhalke) हे दोघेही हयात नाहीत. पंढरपूरच्या राजकाणात शाश्‍वत नेतृत्वाची उणीव आजही कायम आहे. पंढरपूरचे परमनंट आमदार कोण? याचे उत्तर कदाचित २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळण्याची शक्‍यता असल्याने त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. (Pandharpur Corridor News Update)

सांगोला, माढा, पंढरपूर-मंगळवेढा, मोहोळ अशा चार विधानसभा मतदार संघात विभागल्या गेलेल्या पंढरपूर तालुक्‍याची चार विधानसभा मतदार संघात निर्णायक ताकद आहेत. त्यामुळे पंढरपुरात काय चाललंय, याचा इफेक्‍ट चार आमदारांवर नक्कीच होतो. पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतून काय काय समीकरणं जन्माली आली आहेत, याचा आता टप्प्या टप्प्याने उलघडा होऊ लागला आहे.

Prashant Paricharak, Bhagirath Bhalke, Abhijit Patil, Samadhan Autade
देशमुखांच्या स्वागतासाठी रॅली; राष्ट्रवादी युवक अध्यक्षांसह १०० जणांवर गुन्हा दाखल

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना आमदार करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माघार घेतली. त्यावेळी तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आवताडे-परिचारक यांच्यात ठरलेले वादे-वायदे आजही शाबूत आहेत का? या बद्दल साशंकता आहे.

Prashant Paricharak, Bhagirath Bhalke, Abhijit Patil, Samadhan Autade
Sushilkumar Shinde : निवडणूक न लढविण्याची घोषणा करणारे शिंदे म्हणतात ‘मी अजून म्हातारा झालो नाही..’

राज्यात आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ता नसतानाही भाजपने जिंकलेली पंढरपूर ही एकमेव जागा आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा आमदार विजयी व्हायचा तिथे भाजपचा उमेदवार पहिल्यांदा विजयी झाला. या मतदार संघात पुन्हा भाजपचा आमदार करण्यासाठी आवताडे की परिचारक या पैकी कोण? हे भाजपला स्पष्टच करावे लागणार आहे. जशी स्थिती भाजपमध्ये असलेल्या आमदार आवताडे व माजी आमदार परिचारक यांच्या बाबतीत आहे, तशीच स्थिती राष्ट्रवादीत भगीरथ भालके व अभिजीत पाटील यांच्या बाबतीत आहे.

Prashant Paricharak, Bhagirath Bhalke, Abhijit Patil, Samadhan Autade
Ajit Pawar : अब्दुल सत्तारांच्या उत्तरावर अजितदादांचे प्रश्नचिन्ह, म्हणाले..

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत हारलेले राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना ओव्हरटेक करून अभिजीत पाटील केव्हा बारामतीकरांचे विश्‍वासू झाले, हे भालके यांनाही समजले नाही. अभिजित पाटील यांनी सध्या कारखानदारी आणि राजकीय वाटचाल यामध्ये नागपूर आणि बारामतीचा ठेवलेला सेम व सेफ बॅलन्स अनेकांची झोप उडवू लागला आहे. अभिजीत पाटील आमदारकीच्या शोधात माढ्याकडे जाणार की पंढरपुरात लढणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Prashant Paricharak, Bhagirath Bhalke, Abhijit Patil, Samadhan Autade
'' बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा...'' अनिल परबांचं आव्हान ; शिंदेंचाही पलटवार, म्हणाले...

पंढरपूरच्या विकासासाठी ज्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता, ते (स्व.) सुधाकरपंत पचिारक व (स्व.) भारत भालके हे दोघेही सध्या हयात नसल्याने कोणी सांगायचं? आणि कोणी ऐकायचं? याबद्दल एकवाक्‍यता दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेला पंढरपूर कॉरिडॉर खदखदत आहे. पंढरपूर बिघडले तर महाराष्ट्र गावागावांपर्यंत बिघडू शकतो, याची जाणीव कदाचित भाजपच्या सत्ताधाऱ्यांना असल्याने या बाबतीत जपून पावले टाकली जात आहे.

धडाडीच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची गरज

पंढरपूरच्या विकासाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शाश्‍वत राजकीय नेतृत्व सध्या पंढरपुरात नाही. पंढरपूरच्या बाबतीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रशासकीय नेतृत्व, संवाद कौशल्य, समोरच्याला सहमत करण्यासाठी कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळे पंढरपूरचा कॉरीडॉरचा प्रश्‍न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. कॉरीडॉरसाठी पूर्णवेळ व वरिष्ठ सनदी अधिकारी नियुक्त करण्याची आवश्‍यकता आहे. तरच कॉरीडॉरचा विषय वाद-विवादाशिवाय वेळेत मार्गी लागू शकतो.

तुळजापूर देवस्थान सुरळित करण्याचा व कमी दिवसांमध्ये नाशिकचा कुंभमेळा यश्‍वस्वी करण्याचा अनुभव असलेले डॉ. प्रवीण गेडाम यांच्या रुपाने सरकारकडे पंढरपूर कॉरीडॉरसाठी चांगला पर्याय आहे. या शिवाय पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी ६५ एकरांवर कायमस्वरूपी निवाऱ्याची व्यवस्था, चंद्रभागेत स्नान करण्याठी कायमस्वरूपी पाणी राहवे, याकरिता विष्णुपद बंधारा हे विषय मार्गी लावणारे तुकाराम मुंडे यांचादेखील पर्याय सरकारकडे आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम केल्याने त्यांना जिल्हा आणि जिल्ह्याला हे दोन्ही अधिकारी चांगलेच माहिती आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com