Nana Patole Sarkarnama
विदर्भ

IB report Modi government : IBच्या अहवालामुळे खळबळ? ‘कॉक्रोच जनता पार्टी’ अकाऊंट हॅकप्रकरणी नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole alleges BJP targeted viral Cockroach Janta Party social media campaign amid rising public anger : अवघ्या काही दिवसांत सोशल मीडियावर कोटींचा प्रतिसाद मिळालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ प्रकरणाला नवं वळण; अकाऊंट हॅक झाल्याच्या दाव्यानंतर केंद्र सरकारवर दडपशाहीचे आरोप नाना पटोले यांनी केला.

Pradeep Pendhare

Cockroach Janta Party hacked : देशभरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ प्रकरणाने आता नवं वळण घेतलं आहे. अवघ्या दहा दिवसांत लाखो-कोटी फॉलोअर्स मिळवत प्रस्थापित राजकीय पक्षांनाही मागे टाकणाऱ्या या डिजिटल मोहिमेचं सोशल मीडिया अकाऊंट अचानक हॅक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांनी दावा केला की, “देशातील वाढत्या जनक्षोभाबाबत IBने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोपनीय अहवाल दिला होता. हा रोष वेळेत थांबवला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशाराही त्या अहवालात देण्यात आला होता. त्यानंतरच सत्ताधारी भाजपकडून ‘कॉक्रोच जनता पार्टी’चं सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक किंवा हॅक करण्यात आलं.”

नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधत म्हटलं, “देशातील वाढता जनक्षोभ आणि असंतोष दडपण्यासाठी केंद्र सरकार दडपशाहीचा मार्ग स्वीकारत आहे. सोशल मीडिया (Social Media) अकाऊंट्स बंद करून सरकार जनतेचा आवाज दाबू शकत नाही.”

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधानांनी विरोधकांचे अकाऊंट्स ब्लॉक करण्यापेक्षा IBला देशातील खरी परिस्थिती विचारली पाहिजे. आज शेतकरी, बेरोजगार तरुण, गरीब आणि सामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. हा उद्रेक कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकतो.”

‘कॉक्रोच जनता पार्टी’ प्रकरण?

या संपूर्ण वादाची सुरुवात 15 मे रोजी झाली. एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश Surya Kant यांनी बेरोजगारी आणि व्यवस्थेविरोधातील असंतोषावर भाष्य करताना, “काही तरुणांना रोजगार किंवा करिअरमध्ये जागा मिळत नाही, त्यामुळे ते कॉक्रोचसारखे सर्वत्र पसरतात,” असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि ‘कॉक्रोच’ हा शब्दच विरोधाचं प्रतीक बनला.

निषेध मोहिमेला वेग

यानंतर 16 मे रोजी अभिजीत दिपके यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक गुगल फॉर्म शेअर करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. सुरुवातीला ही मोहीम केवळ डिजिटल व्यंग आणि निषेध म्हणून पाहिली जात होती. मात्र काही दिवसांतच या मोहिमेने सोशल मीडियावर प्रचंड वेग घेतला.

प्रस्थापित पक्षांनाही मागे टाकलं

विशेष म्हणजे, ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या सोशल मीडिया हँडल्सना मिळालेला प्रतिसाद पाहून अनेक राजकीय वर्तुळांच्या भुवया उंचावल्या. काही दिवसांतच या पेजने लाखो-कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठल्याचा दावा करण्यात आला. युवक, बेरोजगारी, महागाई आणि सरकारविरोधातील असंतोष या मुद्द्यांवर ही मोहीम मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मात्र, अचानक या पार्टीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

सोशल मीडियावर ‘कॉक्रोच’ ट्रेंड कायम

दरम्यान, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हा हॅशटॅग अजूनही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत असून, युवकांकडून मीम्स, पोस्ट्स आणि डिजिटल मोहिमांद्वारे सरकारविरोधातील भावना व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणामुळे सोशल मीडिया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डिजिटल आंदोलन या मुद्द्यांवर नवी राजकीय चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT