Cockroach Janata Party Goes Viral : ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर गार्डियन ते रॉयटर्सची नजर; व्यंग की बंड? देशातील युवकांचा संताप जगभर चर्चेत

Cockroach Janata Party: How viral social media trend becamevoice of India frustrated youth : बेरोजगारी, महागाई आणि करिअरमधील असुरक्षिततेविरोधात युवकांचा डिजिटल आवाज; आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतली आहे.
Cockroach Janata Party Goes Viral
Cockroach Janata Party Goes ViralSarkarnama
Published on
Updated on

Cockroach Party viral news : देशभरात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) प्रकरणाने आता आंतरराष्ट्रीय माध्यमांचंही लक्ष वेधलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका वक्तव्यापासून सुरू झालेलं हे प्रकरण आता युवकांच्या असंतोषाचं प्रतीक बनताना दिसत आहे.

बेरोजगारी, महागाई, करिअरमधील असुरक्षितता आणि राजकीय व्यवस्थेबद्दल वाढती नाराजी या पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे, या डिजिटल आंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली आहे. द गार्डियन, अल जझीरा, रॉयटर्स आणि खलील टाईम्स यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’वर सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.

15 मे रोजी एका खटल्यादरम्यान भाष्य करताना सरन्यायाधीश सूर्य कांत (Supreme Court) यांनी, “व्यवस्थेवर हल्ला करणारे काही परजीवी समाजात आहेत. काही तरुणांना रोजगार किंवा करिअरमध्ये जागा मिळत नाही, त्यामुळे ते कॉक्रोचसारखे सर्वत्र पसरतात,” असे विधान केले होते. या वक्तव्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. युवकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत ‘कॉक्रोच’ हा शब्दच प्रतिकाराचं प्रतीक बनवला.

यानंतर अवघ्या एका दिवसात, 16 मे रोजी, 30 वर्षीय अभिजीत दिपके यांनी एक्सवर एक गुगल फॉर्म शेअर करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. सुरुवातीला ही मोहीम केवळ व्यंगात्मक आणि डिजिटल आंदोलन म्हणून पाहिली जात होती. मात्र काही दिवसांतच या मोहिमेने सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड वेग घेतला.

Cockroach Janata Party Goes Viral
Onion Prices Crash : कांद्याला 1 रुपया किलो भाव; शेतकरी संतप्त , जमिनी पंतप्रधानांच्या नावावर करून देण्याचा इशारा

आज परिस्थिती अशी आहे की, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सोशल मीडियावर लाखो समर्थक झाले आहेत. इन्स्टाग्रामवर या पेजचे जवळपास 2 कोटी फॉलोअर्स झाल्याचा दावा केला जात असून, हा आकडा सत्ताधारी भारतीय जनता पक्षच्या अधिकृत फॉलोअर्सपेक्षाही जास्त असल्याची चर्चा रंगली आहे. मीम्स, व्यंगचित्रं, उपरोधिक पोस्ट आणि बेरोजगारीवर थेट भाष्य करणाऱ्या मोहिमांमुळे युवक मोठ्या प्रमाणात या ट्रेंडशी जोडले जात आहेत.

Cockroach Janata Party Goes Viral
Modi Italy Controversy : मोदींच्या इटली दौऱ्यामागे ‘गुपित’? प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; ‘4 जहाजं, मिलिटरी स्टील अन् इस्रायल कनेक्शन’

द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दिपके म्हणाले, “हे काही ठरवून घडलेलं नाही. पण युवकांचा प्रतिसाद देशातील वाढती निराशा दाखवतो. तरुणांकडे स्वतःचं मत मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ नाही. त्यामुळे सरकार आणि व्यवस्थेबद्दल प्रचंड असंतोष वाढत आहे.”

अल जझीराने आपल्या वृत्तात या मोहिमेला काही राजकीय नेत्यांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याचं नमूद केलं आहे. महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद यांच्यासह काही विरोधी पक्षातील नेत्यांनी सोशल मीडियावर या ट्रेंडबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दक्षिण आशियातील युवक आंदोलनांच्या संदर्भात श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशातील आंदोलनांची आठवण करून देत, जेन-झी पिढीतील वाढत्या असंतोषाकडेही अल जझीराने लक्ष वेधलं आहे.

रॉयटर्सने आपल्या विश्लेषणात, “अवघ्या काही दिवसांत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल मोहिमांपैकी एक ठरली आहे,” असे म्हटले आहे. महागाई, बेरोजगारी आणि राजकीय व्यवस्थेवरील टीका या मुद्द्यांना विनोदी आणि उपरोधिक शैलीत मांडल्यामुळे युवक या मोहिमेकडे आकर्षित होत असल्याचेही रॉयटर्सने नमूद केले आहे.

तर यूएईमधील खलीज टाइम्सने, “ही एक डिजिटल चळवळ आहे; जरी तिचं नाव राजकीय पक्षासारखं असलं, तरी ती प्रत्यक्ष निवडणूक लढवेल असं सध्या तरी दिसत नाही,” असे म्हटले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हा केवळ ट्रेंड राहिलेला नाही, तर तो युवकांच्या नाराजीचा डिजिटल आवाज बनत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, महागाई आणि करिअरमधील अनिश्चिततेमुळे त्रस्त असलेल्या नव्या पिढीने या मोहिमेला स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम बनवलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा ट्रेंड केवळ सोशल मीडिया मोहिम राहतो की प्रत्यक्ष सामाजिक-राजकीय चळवळीत रूपांतरित होतो, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com