Gulabrao Patil Sarkarnama
विदर्भ

Complaint filed Against Gulabrao Patil : पालकमंत्री गुलाबराव पाटलांना दाखवा, ११०० रुपये बक्षीस मिळवा ; पोलीस ठाण्यात तक्रार

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon Jamod : अतिवृष्टी व पुरामुळे विदर्भातील पिके पाण्याखाली गेली असून शेतीचे नुकसान झाले आहे.. मात्र, अजूनही पंचनामे झालेले नाहीत, शेतकऱ्यांना मदतीची आस आहे, अशा परिस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केला आहे.

ठाकरे गटाचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष गजानन वाघ यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या विरोधात चक्क जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. "पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना येथे दाखवून देईल, त्याला ११०० रुपये बक्षीस देण्यात येईल," असे गजानन वाघ यांनी जाहीर केले आहे.

"जळगाव जामोद व संग्रामपुऱ्या तालुक्यात पावसाने धुमाकुळ घातला होता, यात हजारो गुरंढोरं वाहून गेले, शेतामध्ये पाणी आहेत. हजारो घरे वाहून गेलीत, नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकत्व स्वीकरणाऱ्या गुलाबराव पाटलांनी एकदाही आमची साधी विचारपूस केली नाही, पाच दिवस झाले, लोक उपाशी पोटी दिवस काढत आहेत, कुठलीही मदत नाही," अशी खंत गजानन वाघ यांनी व्यक्त केली आहे.

अमरावती जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून अनेक भागात अतिवृष्टी तर काही पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एक लाख 42 हजार 612 एकरावरील पिकांना फटका बसला आहे. अनेक जमिनी खरडून गेल्या तर अनेक पिकं पाण्याखाली आली आहेत. अद्यापर्यंत प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाली नाही व पंचनामा सुद्धा केल्या नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊन आता तीन दिवस उलटले असताना कोणताही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आमच्या बांधावर आला नाही पिकांची पाहणी केली नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. आमच्या शेतीचे पंचनामे केव्हा करणार? असा प्रश्न शेतकरी प्रशासनासह शिंदे-फडणवीस-पवार सरकारला विचारत आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT