Congress  Sarkarnama
विदर्भ

Congress Bharat Jodo News : 'भारत जोडो' ठरली जिल्हाध्यक्ष 'तोडोचे' कारण !

Akola Congress News : काँग्रेस मधील ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा विरोध मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

जयेश विनायकराव गावंडे

Akola Political News : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला काही प्रमाणात का होईना 'नवचैतन्य' मिळाले असल्याची चर्चा सुरू आहे. असे असतानाच अकोला जिल्ह्यात मात्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली. भारत जोडो यात्रेपासूनच काँग्रेस मधील ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा विरोध मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (The opposition to the rural district president in the Congress has increased to a large extent)

ग्रामीण जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी काही सहकार नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी पक्ष निरीक्षकांसोबत बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या विरोधात काँग्रेसमधील सहकार गटाच्या नेत्यांनी 'रणशिंग' फुकलं आहे. अकोला जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या दोन दशकांपासून केवळ पक्षातील गटबाजीमुळे काँग्रेस पक्ष जिल्ह्यात रसातळाला गेली आहे.

१९८९ पासून अकोला लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून आला नाही, तर अकोला जिल्ह्यातील विधानसभेची पाटीही गेल्या कित्येक वर्षांपासून कोरिच आहे. काँग्रेस वाढीसाठी कुणाकडूनच प्रयत्न झाले नसल्याचे यावरून लक्षात येत आहे. जिल्ह्यात नेत्यांमधील गटामुळे कार्यकर्त्यांचीही वाताहत झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी इतरपक्ष संघटनात्मक बांधणीवर जोर देत असताना जिल्हा काँग्रेसमधील नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी सध्या करण्यातच धन्यता मानत आहेत.

याचा प्रत्यय म्हणून आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांचा विरोध वाढला आहे. जिल्हाध्यक्षच बदलण्याची मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. त्यासाठी आता तालुक्याच्या ठिकाणी पक्ष निरीक्षकांची बैठक घेऊन विरोध करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अकोट, बार्शीटाकळी येथील बैठकीत पक्ष निरीक्षकांची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. आता हीच बैठक प्रत्येक तालुक्यात घेण्यात येणार आहे.

भारत जोडो यात्रेचा फायदा झालाच नाही !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला देशासह राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. अकोला जिल्ह्यात दोन दिवस भारत जोडो यात्रा मुक्कामी होती. याचा मोठा फायदा जिल्ह्यात काँग्रेसला झाला. या यात्रेदरम्यान जिल्ह्यातील अनेक सामान्य नागरिक यात्रेसोबत जुळले होते. जिल्ह्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली.

मात्र भारत जोडो यात्रेचा पाहिजे तसा फायदा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करून न घेता केवळ अंतर्गत गटबाजीत गुंतून राहिले. भारत जोडो यात्रेपासूनच जिल्हाध्यक्षांचा विरोध मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारत जोडो यात्रेत जिल्हाध्यक्षांनी इतरांना विश्वासात न घेता स्वतःच मोठं होण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काहींनी केला आहे.

आता पुढची बैठक होणार बाळापूरला..

जिल्हाध्यक्षांच्या विरोधातील खदखद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी निवडणुकांपूर्वी जिल्हाध्यक्ष बदलून नवीन जिल्हाध्यक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी सहकार गटासह काही पदाधिकाऱ्यांनी आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पक्ष निरीक्षकांची बैठक घेऊन तशी मागणी करण्यात येत आहे. बैठकीत जिल्हाध्यक्षांनी कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता नाराज नेते व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.

जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक..

होणाऱ्या विरोधावरून जिल्हाध्यक्ष बदलल्यास जिल्ह्यातील अनेक चेहरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाध्यक्ष पदावर काहींच्या मते युवा नेतृत्वाला संधी देण्याची मागणी केली जात. त्यामुळे येणाऱ्या काळात होणारा विरोध आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतातरी काँग्रेसने पक्ष बांधणीसाठी वाढीसाठी प्रयत्न करावे आणि काँग्रेसला जिल्ह्यात अच्छे दिन यावे, अशीच अपेक्षा सामान्य कार्यकर्ता व्यक्त करीत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT