Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Congress Challenge to CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे गुडधे यांचे पुन्हा चॅलेंज, आता सर्वोच्च न्यायालयात धाव

Praful Gudde Challenge too Chief Minister Devendra Fadnavis : गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. पण ती नियमांचा दाखल देऊन फेटाळण्यात आली होती.

Rajesh Charpe

Summary :

  1. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडधे यांनी निवडणुकीत मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे.

  2. एकाच फोन नंबरवर 40 ते 100 मतदारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती, असा गुडधे यांचा दावा आहे.

  3. हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर गुडधे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे, ज्यामुळे फडणवीसांना पुन्हा एकदा आव्हान मिळाले आहे.

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ होता. एकाच फोन नंबरवरून 40 ते शंभर मतदारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक मॅनेज केली? असा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल गुडधे यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे गुडधे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना चॅलेज दिल्याचे बोलले जात आहे.

गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. निवडणुकीशी संबंधित याचिका दाखल करताना प्रत्यक्ष याचिकाकर्ता उपस्थित राहाणे बंधनकारक असल्याचा युक्तिवाद फडणवीस यांच्यावतीने करण्यात आला होता. गुडधे हे याचिका दाखल करताना न्यायालयात उपस्थित नव्हते. या नियमांचा दाखल देऊन त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.

विधानसभेच्या निवडणुकीच गुडधे मोठ्या फरकांच्या मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईव्हीएमने निवडणूक घेताना आयोगाने त्याची अधिसूचना का काढली नाही. यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. सोबतच उमेदवारांना व्हीव्हीपॅट उपलब्ध करून दिले जात नाही, असाही दावा त्यांनी केला होता.

राहूल गांधी यांनी महाराष्ट्राची निवडणूक भाजपने मॅनेज केली असा आरोप केला होता. त्यात त्यांनी फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही उल्लेख केला आहे. या मतदारसंघात लोकसभा ते विधानसभा या पाच महिन्यांच्या कार्यकाळात मोठी वाढ झाली आहे. बहुतांश मतदार बोगस असल्याचा आरोप त्यांचा होता.

त्यानंतर गुडधे यांनी पत्रकार परिषद घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदीचा तपशील निवडणूक आयोगामार्फत दिला जात नसल्याचे सांगितले. माहिती अधिकार कायद्यांतर्गतही माहिती दिली जात नाही. ऑनलाईन आणि ऑफलाईन मतदार नोंदणीचा स्वतंत्र डेटा उपलब्ध नसल्याचे आपणास कळवण्यात आल्याचे गुडधे यांनी सांगितले होते.

यावेळी त्यांनी एकाच मोबाईल नंबरवरून 40 ते 100 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. याची एकाही अधिकाऱ्याने पडताळणी केली नाही. वास्तविक मतदार नोंदणीत शंका आल्यास प्रत्यक्ष स्थळी जाऊन सबंधित अधिकाऱ्याने खातरजमा करण्याचा नियम आहे. तोही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पाळला गेला नाही. निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली. याच वाढीव मतदारांच्या मतदानातून फडणवीस निवडून आले. त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी गुडधे यांनी यापूर्वीच केली आहे. गुडधे काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव असून मतदार याद्या तपासण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या समितीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

FAQs :

प्रश्न 1: प्रफुल गुडधे यांनी कोणत्या प्रकारचा आरोप केला आहे?
उत्तर: त्यांनी एकाच फोन नंबरवर शेकडो मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोप करत निवडणूक व्यवस्थापन फडणवीसांनी केल्याचा दावा केला आहे.

प्रश्न 2: याप्रकरणी न्यायालयात काय झाले?
उत्तर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्यानंतर प्रफुल गुडधे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्रश्न 3: या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: या प्रकरणामुळे फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारवर संशयाची सुई निर्माण झाली आहे आणि काँग्रेसकडून पुन्हा राजकीय आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT