.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Devendra Fadnavis : वीजेचे दर दरवर्षी वाढतच असतात त्यामुळं सर्वसाधारण ग्राहकांवर त्याचा मोठा ताण येत असतो. पण आता २०३० पर्यंत ग्राहकांचं वीजबिल हे वाढणारच नाही तर २६ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण हे बील कसं कमी होणार? याचा फॉर्म्युलाही फडणवीसांनी सांगितला आहे. वर्धा इथं भाजपचं मंथन शिबिर सुरु आहे, यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "देशाच्या इतिहासात महायुतीचं सरकार हे पहिलं सरकार ठरणार आहे ज्या सरकारनं २०२५ पासून २०३० पर्यंत वीजेचे दर घोषित केले. गेल्या २० वर्षात दरवर्षी वीजेचे दर नऊ टक्क्यांनी वाढतात. हे सर्वसामान्य ग्राहकांच्या लक्षात येत नाही, आपल्याला बिलामध्ये ते भरावे लागतात. कारण MERC हे दर वाढवतात सरकार वाढवत नाही.
पण आता मात्र आपण नवीन जे दर MERC कडून मंजूर करुन घेतले त्यानुसार, दरवर्षी आपण वीजेचे दर कमी करणार आहोत. म्हणजे आपल्या ७० टक्के ग्राहकांना जे १०० युनिटपर्यंत वीज वापरतात त्या ७० टक्के वीज ग्राहकांना तर २०२४ मध्ये जे बिल होतं ते वाढण्याऐवजी २०३० पर्यंत ते २६ टक्क्यांनी कमी होणार आहे"
दरवर्षी ते कमी होत जाणार आहे. त्यामुळं आता वीजेची दरवाढ यावर विरोधकांना आता आंदोलनच करता येणार नाही. कारण पाच वर्षांसाठी सरकारनं वीजेचे दर घोषित करुन टाकले आहेत, दरवर्षी ते आपण कमी केले आहेत. त्यामुळं एकप्रकारे मोठं ट्रान्सफॉर्मेशन याठिकाणी सरकारकडून सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.