
Wardha, 28 July : महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती कायम राहील याची कोणालाच शाश्वती नाही. भाजपने महायुती करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना सोपवले असल्याचे जाहीर केले आहे. यात वरिष्ठ हस्तक्षेप करणार नाहीत, असा दावा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यामुळे महायुतीत अस्वस्था पसरली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. शक्यतो सर्वच ठिकाणी महायुती म्हणूनच आपण निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही अडचणी जिथे असतील, तेथे महायुती तुटली तरी एकमेकांवर जाहीर टीका टिपण्णी करणे टाळा, असा सल्ला फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना देऊन स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची वज्रमूठ कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर पालिका (स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक Local Body Election)निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समित्यांचे गण तसेच प्रभागाची नव्याने रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेचे गट जाहीरसुद्धा झाले आहेत. महापालिकांना प्रभाग रचनेकरिता एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
या सर्व निवडणुकीबाबत भाजपच्या वतीने मंथन, चिंतन करण्यासाठी वर्धा येथे विदर्भातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री फडणीस यांनी महायुतीबाबत स्पष्ट मत मांडले. राज्यात महायुतीची सत्ता आहे. केंद्रातही आपण सर्व एकत्र आहोत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकही आपण एकत्रच लढणार आहोत. काही ठिकाणी अपवाद किंवा अडचण असेल तेथेच फक्त मैत्रीपूर्ण लढती होती. असे असले तरी महायुतीचा उमेदवार विरोधात असला तरी एकमेकांवर टीका किंवा आरोप करणे टाळा, आपण विधानसभेत एकत्र आहोत, हे ध्यानात असू द्या असे ते म्हणाले.
निवडणुका जवळ येऊ लागल्याने विरोधक आता वेगवेगळे नरेटिव्ह निर्माण करणार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही. त्यांचा प्रचाराचा सर्व भर खोट्या नरेटिव्हवरच राहणार आहे.
मराठी-हिंदी भाषेचा वाद हासुद्धा नरेटिव्हचा एक भाग आहे. आपण मराठी भाषा अनिवार्य केली आहे. तिसरी भाषा म्हणून कुठलीही भाषा निवडण्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यात हिंदीची सक्ती केली नाही. फक्त तिसरी भाषा कुठली निवडायची एवढाच वाद आहे. मात्र या वादाला मराठी विरुद्ध हिंदी असा रंग देण्यात आला.
समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न केला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना या वेळी लागवाला. मात्र, काळजी करण्याची गरज नाही. ‘ये पब्लिक है, सब जाणती है’ असे सांगून फडणवीस यांनी आपण आपली कामे घेऊन मतरादारांकडे जा, आपले व्हीजन त्यांना सांगा. मतदार आपल्याला निवडून देण्यास तयार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष होता. आता आपलाच विक्रम आपल्याला तोडायचा आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.