Chotu Bhoyar and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांना मिळाले केवळ स्वतःचे मत

चंद्रशेखर बानवकुळे यांनी काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे.

सरकारनामा ब्युरो

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीच्या आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार डॉ. रवींद्र उर्फ छोटु भोयर (Ravindra Bhoyar) यांना त्यांचे स्वतःचे एक मत मिळाले आहे. काँग्रेस सारख्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला केवळ एक मत मिळणे, ही काँग्रेसची नाचक्की मानली जात आहे.

नागपूरमध्ये पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) जबाबदार असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. आज सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मते प्राप्त झाली.

नाना पटोले यांनी मतदानाच्या आदल्या रात्री उमेदवार बदलवून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा घोषित केला. त्यामुळे काँग्रेससह महाविकस आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार सदस्य संभ्रमित झाले आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण बानवकुळे यांना काँग्रेसची मतंही मिळाली आहेत.

भोयर यांनी या पराभवानंतर भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. तसेच नाना पटोले यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. पण ऐनवेळी उमेदवार बदलावा लागण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवल्यानेच हा पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अकोल्यातही महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झालं आहे. 400 हून अधिक मतं असलेल्या आघाडीच्या उमेदवाराला 334 एवढीच मतं मिळाली आहे.

शेलारांची पटोलेंवर टीका

भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शेलार यांनी ट्विट करत पटोले यांना विनोदवीर म्हणत टोला लगावला आहे. तसेत त्यांचे हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

नागपूर, अकोला निवडणूकीत आघाडीची 96 मतं फुटली. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबईत, धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर असंच नाक कापलं असतं, असंही शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT