मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत नागपूर व अकोला या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नागपुरमध्ये चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankule) तर अकोल्यात वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीची (MahaVikas Aghadi) मतं फुटल्याचे स्पष्ट झालं आहे. आघाडीच्या या पराभवानंतर आता भाजपने जोरदार टोलेबाजी सुरू केली आहे.
भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शेलार यांनी ट्विट करत पटोले यांना विनोदवीर म्हणत टोला लगावला आहे. तसेत त्यांचे हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
नागपूर (Nagpur), अकोला (Akola) निवडणूकीत आघाडीची 96 मतं फुटली. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबईत, धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर असंच नाक कापलं असतं, असंही शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, नागपूर विधानपरिषद निवडणूकीत बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल ३६२ मते घेऊन बावनकुळे विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकस आघाडीची तब्बल ४४ मते फोडली आहेत. कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. रविंद्र उर्फ छोटू भोयर यांना केवळ १ मत मिळाले तर कॉंग्रेस पुरस्कृत म॔गेश देशमुख यांना १८६ मत मिळाली.
अकोला, बुलडाणा, वाशीम मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली आहे. त्यांना 443 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना 334 एवढी मते मिळाली. भाजपकडे असलेली स्वत:ची हक्काची मतं पाहता महाविकास आघाडी फोडत हा चमत्कार घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी व अपक्षांना खेचण्यातही भाजपला यश मिळाल्याचे दिसते. विजयाची हॅट्रीक केलेले गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.