अकोल्यात चमत्कार करत भाजपनं महाविकास आघाडी फोडली!

भाजपनं विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला आहे.
MahaVikas Aghadi

MahaVikas Aghadi

Sarkarnama

Published on
Updated on

अकोला : विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूकीत अकोला, बुलडाणा, वाशीम मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल (Vasant Khandelwal) यांनी बाजी मारली आहे. त्यांना 443 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoriya) यांना 334 एवढी मते मिळाली. भाजपकडे (BJP) असलेली स्वत:ची हक्काची मतं पाहता महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) फोडत हा चमत्कार घडवल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी (VBA) व अपक्षांना खेचण्यातही भाजपला यश मिळाल्याचे दिसते.

विजयाची हॅट्रीक केलेले गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी केंद्रावर महाविकास आघाडी तसेच भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयातील तिन्ही मतदारसंघातील 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदान केले. बाजोरिया पुन्हा चमत्कार दाखवतात की खंडेलवाल त्यांची विजयी घोडदौड थांबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

<div class="paragraphs"><p>MahaVikas Aghadi</p></div>
भाजपकडून आघाडीला धक्का; खंडेलवाल यांची बाजोरियांवर मात

शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य या नात्याने गेली अठरा वर्षे गोपीकिसन बाजोरिया या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे समीकरण बदलले. त्यामुळे भाजपने उद्योगपती वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बाजोरिया आणि खंडेलवाल यांच्यात तुल्यबळ लढत झाली. महाविकास आघाडीची एकूण 306 मते होती. बाजोरिया यांना केवळ 334 मतं मिळाली. तर भाजपकडे केवळ 245 मतं असताना खंडेलवाल यांनी 443 मतं मिळवत चमत्कार घडवला.

महाविकास आघाडीतील मतभेद, याशिवाय शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस या सर्वांचा परिणाम विधान परिषदेच्या मतदानावर झाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. महा विकास आघाडीतील मतदान मोठ्या प्रमाणावर फुटल्याने गोपीकिशन बाजोरिया त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने भाजपला दिलेली साथही परिणाम करणारी ठरली.

<div class="paragraphs"><p>MahaVikas Aghadi</p></div>
चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा आमदार : महाविकास आघाडीची मते फोडली

राजकीय गणितं जुळवत भाजपने महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. बाजोरिया यांना यापूर्वी तीन वेळा विजयी होताना भाजपच्या सदस्यांची साथ मिळत होती. यावेळी मात्र, त्यांच्याविरुद्धच लढण्याची वेळ आल्याने त्यांना आता अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांवर अवलंबून राहावे लागले होते. दुसरीकडे भाजपने अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे राजकारणातील गणितं ‘सरळ’ करून देताना हा एक गठ्ठा मतदार वळविण्याचे प्रयत्न केल्याचे दिसते.

तिन्ही जिल्ह्यातील पक्षांची सदस्य स्थिती -

महाविकास आघाडीची एकूण मते - 406

-वंचित : ८६

-भाजप : २४५

- एमआयएम : ०७

- अपक्ष / आघाडी : ७८

-एकूण : ८२२

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com