Sudhakar Adbale News Sarkarnama
विदर्भ

Nagpur News : काँग्रेसने पुन्हा करुन दाखवले; भाजपचा नागपुरात करेक्ट कार्यक्रम : अडबालेंच्या विजयाची पाच कारणे

Sudhakar Adbale News : नागपूर शिक्षक मतदार संघात भाजपचा मोठा फराभव

Amol Jaybhaye

Nagpur Teacher Election News : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार (Nagpur Teacher Election) संघात काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा तब्बल सात हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

गाणार यांना भाजपमधीलच गटबाजी भोवल्याची चर्चा आहे. त्यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये सुरुवातीपासून दोन गट होते. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत नाराजीजा त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे त्यांना शिक्षकांच्याही नाराजीचा फटका बसला. विशेषता जुन्या पेन्शन योजनेवरुन गाणार यांच्या विरोधात शिक्षकांची नाराजी होती. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे शिक्षकांनी काँग्रेसचे (Congress) उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या पारड्यात मते टाकली.

या निवडणुकीत पदवीधरच्या निवडणुकीप्रमाणे काँग्रेस एकसंघ दिसली. तसेच महाविकास आघाडीमध्येही चांगला समन्वय दिसल्याचे जाणकार सांगतात. सुरुवातील उमेदवारीवरुन झालेल्या गोंधळानंतर आघाडी सावरली. आणि अडबाले यांच्या विजयासाठी एकसंघ पने मैदानात उतरली. काँग्रेसनेही पदवीधरची पुनरावृती करायची असा चंग बांधला होता, त्याचे रुपांतर अडबालेंच्या विजयात झाले.

गाणार यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने (BJP) अखेरच्या टप्प्यापर्यंत निर्णय गेतला नव्हता. मात्र, दुसरीकडे अडबाले यांनी मागील दोन वर्षांपासूनच अधिकृतपणे तयारी सुरु केली होती. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दीड वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत अडबाले यांना अधिकृत पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनी मोठी तयारी केली होती.

दीड वर्षांच्या कालावधीत सहाही जिल्ह्यात संपर्क, समविचारी संघटना, समविचारी पक्षाशी जुळवून घेत सुधाकर अडबाले यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी विजय सोपा झाला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे हा पराभव भाजपच्या जीव्हारी लागणार आहे. गाणार यांच्यासाठी गडकरी, फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यात विजय मिळवणे पक्षाला जमले नाही. नागपुरमध्ये पदवीधर पाठोपाठ शिक्षक मतदार संघातही भाजपचा पराभव झाल्याने ही पक्षासाठी धोक्याची घंडा असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT