Nagpur Teachers Election : नागपुरात भाजपचे 'पदवीधरच्या' बदल्यात 'शिक्षक', हिशोब बरोबर!

BJP News : नागपूर शिक्षक मतदार संघात काँग्रेने दणदणीत विजय मिळवला आहे
Nagpur Teacher Election
Nagpur Teacher ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Teacher Election News : दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला होता. त्याचा जबर धक्का भाजपला (BJP) बसला होता. त्यानंतर यावेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप नेते जोखीम पतकारणार नाहीत, असे वाटले होते. पण झाले उलटेच. आजही १२ वर्षे आमदार राहिलेले भाजप समर्थीत उमेदवार नागो गाणार यांना जबर पराभवाचे तोंड बघावे लागले.

या पराभवाचे विश्‍लेषण करताना गेल्या वर्षी झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीच्या निकालावर नजर टाकावी लागेल. त्यावेळी भाजपचे उमेदवार होते, माजी महापौर संदीप जोशी हे भाजच्या नेत्यांच्या अत्यंत विश्वासातील होते. त्यामुळेच त्यांना पदवीधरची उमेदवारी देण्यात आली होती. निवडून येण्याची पूर्ण खात्री असताना त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Nagpur Teacher Election
Nashik Graduate Election : नाशिकमध्ये सत्यजीत तांबे पुढे; पण विजयासाठी झुंजावे लागणार...

जोशींच्या पराभवाची कारणे शोधली असता, वेगळेच राजकारण तेव्हा पुढे आले. संदीप जोशी एका नेत्यांचे समर्थक आहेत, म्हणून ठरवून त्यांचा पराभव करण्यात आला. या मागे भाजपमधीलच दुसऱ्या गटातील काही लोकांचा हात असल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. येथे भाजपमध्ये दोन गट असल्याचे नेहमीच दबक्या आवाजात बोलले जाते. पण उघड उघड बोलण्याची हिंमत कुणीही करीत नाही. पण असा एखादा निकाल लागला की, पुन्हा अशा चर्चा (अर्थात दबक्या आवाजातच) सुरू होतात.

शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार नागो गाणार हे भाजपच्या दुसऱ्या एका गटाचे खास आहेत. गाणारांच्या उमेदवारीसाठी त्या गटाने जोर लावला होता, असेही सांगण्यात येते. गाणारांच्या नावावर पूर्व विदर्भात भाजपमध्ये मोठी नाराजी होती. अनेक आमदार गाणारांना बदलण्याची आवश्यकता असल्याचे (खासगीत) सांगत होते. गाणारांना पाठिंबा दिल्यास आपली सीट पडणार, असेही काही भाजप नेते छाती ठोकून सांगत (अर्थातच खासगीत) होते. त्यामुळे या निवडणुकीतही या दोन्ही गटामध्येच मोठे राजकारण रंगल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur Teacher Election
Nashik Graduate Election : पहिल्या फेरीत सत्यजीत तांबेंना मोठी आघाडी...

त्यामुळे तुम्ही आमचा 'पदवीधर' पाडला, आम्ही तुमचा 'शिक्षक' पाडू, असे ठरवून नागो गाणार यांना पाडण्यासाठी भाजपच्याच 'एका' गटातील लोकांनी काम केल्याची माहिती आहे. त्यामुळे ज्या गटबाजीसाठी आजपर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी (NCP) बदनाम होती. त्याच गटबाजीने आता भाजपलाही पोखरणे सुरू केले की काय, हा विचार करण्याची वेळ आजच्या निकालाने आणली, हे मात्र खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com